ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराजवळ शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भाविकांच्या गर्दीत भरधाव ट्रक घुसल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातात मंदिराचे प्रवेशद्वार आणि बाहेरील भिंतीचेही नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. ( Madhya Pradesh accident)
सनातन धर्मात असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा पवित्र सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ...
पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून ट्रक भाविकांच्या गर्दीत घुसला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी पहाटे सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास घडला. छिनोरच्या दिशेने येणारा धान्याने भरलेला ट्रक तीव्र उतारावरून खाली येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अवजड वाहनांना प्रवेशबंदी असलेल्या या रस्त्यावर पोलिसांचे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र, ट्रकने हे अडथळे तोडून पुढे जात रस्त्यावरील भाविकांना धडक दिली. त्यानंतर ट्रक मंदिराच्या प्रवेशद्वाराला आणि बाहेरील भिंतीला जाऊन धडकला.
#WATCH | Madhya Pradesh | Several dead and multiple people injured after a truck ran over several people near a temple in Gwalior
Visuals from the hospital where the injured have been taken https://t.co/9h5R7cNgJW
— ANI (@ANI) October 17, 2026
39 जण रुग्णालयात दाखल
ग्वाल्हेरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर 39 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला असून काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. अपघातात कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. (Gwalior Accident)
जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि मदत पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताच्या कारणांचा तपास सुरू
नवरात्रीच्या काळात या मार्गावर पोलिसांची तपासणी चौकी आणि बॅरिकेड्स असतानाही ट्रक पुढे कसा गेला, याचा तपास सुरू आहे. ट्रकचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पथकाला वाहनाची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. ट्रकचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, याचा शोध घेतला जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने ट्रक क्षमतेपेक्षा अधिक भरलेला असल्याचा दावा केला. ट्रक अचानक गर्दीत घुसल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले, असे त्याने सांगितले. या अपघातात त्याचा भाऊही जखमी झाला आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, अपघातातील मृतांची आणि जखमींची अंतिम संख्या तसेच दुर्घटनेचे नेमके कारण याबाबत अधिकृत तपशीलांची प्रतीक्षा आहे.