रेल्वेने १९८६ पासून संगणकीकृत रेल्वे आरक्षण प्रणाली सुरु केली. पीएनआर क्रमांक हा १० अंकी क्रमांक असतो. पहिले तीन अंक संबंधित डेटाबेस केंद्र आणि रेल्वे विभागाची ओळख देतात. उदाहरणार्थ, दिल्ली ट्रेनचा पीएनआर क्रमांक दोनने, कोलकाताचा सहाने, मुंबईचा आठने आणि चेन्नईचा चारने सुरु होतो. अलीकडेच, रेल्वेने एका प्रायोगिक प्रकल्पात ही प्रणाली राबवली आणि तो पूर्णपणे यशस्वी ठरला.
कुडाळ तालुक्यातील कडावल वर्दे रस्त्यावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवम यांनी सांगितले की, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून पीएनआर मालिका बदलणार आहे. आता पीएनआरची सुरुवात ५००, ७०० सारख्या अंकांनी किंवा एक, तीन, पाच यांसारख्या अंकांनी देखील होऊ शकते. यामध्ये शताब्दी एक्सप्रेस, नवी दिल्ली इंटरसिटी, एपी एक्सप्रेस, केरळ, तामिळनाडू एक्सप्रेस आणि इतर गाड्यांचा समावेश आहे. डॉ. शिवम यांनी स्पष्ट केले की, रेल्वे माहिती प्रणाली केंद्र एका नव्या पिढीच्या आरक्षण प्रणालीवर काम करत आहे. या नवीन प्रणालीचा उद्देश आरक्षणाशी संबंधित तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हा आहे. नवीन पीएनआर मालिका ही या व्यापक तांत्रिक सुधारणेचाच भाग आहे.