Airtel Recharge: एअरटेलचे डेटा नसलेले तीन नवे ‘व्हॉइस आणि एसएमएस’ प्लॅन सादर; जिओशी असणार स्पर्धा

मोबाईलवर इंटरनेटचा वापर न करता केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले आहेत.

मुंबई: मोबाईलवर इंटरनेटचा वापर न करता केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या निर्देशानुसार, डेटा नसलेले ‘व्हॉइस आणि एसएमएस ओन्ली’ प्लॅन सादर करणारी एअरटेल ही देशातील पहिली दूरसंचार कंपनी ठरली आहे. एअरटेलने 185 रुपये, 203 रुपये आणि 206 रुपये किमतीचे हे तीन प्लॅन उपलब्ध केले आहेत. ग्राहकांना रिचार्जमध्ये कशी सुविधा मिळेल, जाणून घेऊया...



प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार आहेत?



  • कॉलिंग: कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग.

  • एसएमएस: प्रत्येक प्लॅनमध्ये ३०० मोफत एसएमएस.

  • अतिरिक्त सुविधा: हॅलो ट्यून्सची मोफत सुविधा (कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दर महिन्याला पसंतीची कॉलर ट्यून सेट करता येईल).

  • डेटा: या प्लॅनमध्ये मोबाईल डेटा किंवा इंटरनेटची सुविधा मिळणार नाही.


प्लॅनची वैधता



  • १८५ रुपये: २८ दिवसांची वैधता.

  • २०३ रुपये: ३० दिवसांची वैधता.

  • २०६ रुपये: संपूर्ण कॅलेंडर महिन्यासाठी वैध.


हे तिन्ही प्लॅन एअरटेल थँक्स ॲप आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. मात्र, या नव्या प्लॅनबाबत एअरटेलकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.



कोणासाठी फायदेशीर?


अनेक ग्राहक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि फीचर फोन वापरणारे, मोबाईलचा वापर प्रामुख्याने बोलण्यासाठी किंवा मेसेजसाठी करतात. यापूर्वी त्यांना गरज नसलेल्या डेटासाठीही पैसे खर्च करावे लागत होते. या ग्राहकांचे बजेट आणि गरज लक्षात घेऊन हे प्लॅन आणले गेल्याचे मानले जात आहे.



जिओचे आधीपासूनच लाँग-टर्म व्हॉइस प्लॅन्स


दुसरीकडे, रिलायन्स जिओकडूनही व्हॉइस-ओन्ली प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स दिले जातात, ज्यामध्ये अधिक कालावधीच्या वैधतेवर भर असतो. जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची आणि १,७४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची वैधता मिळते. या दोन्ही प्लॅन्समध्येही अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस मिळतात, परंतु मोबाईल डेटा दिला जात नाही.

Comments
Add Comment

CISF Jawan : जामा मशीद मेट्रो स्टेशनवर संशयित ताब्यात; सीआयएसएफच्या जवानांचा फिल्मी स्टाईल पाठलाग

दिल्लीतील ऐतिहासिक आणि अत्यंत वर्दळीच्या जामा मशीद मेट्रो स्टेशनवर सुरक्षेला बगल देऊन पळून जाणाऱ्या एका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंजाब दौऱ्यावर! ‘नशारूपी रावण’ दहनातून ड्रग्सविरोधात संदेश

लुधियाना : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मंगळवारी होणाऱ्या लुधियाना दौऱ्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी

भारत आणि पोलांडमध्ये मैत्रीचं नव पर्व ! पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान भारत दौऱ्यावर

भारत आणि पोलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

Weather Alert: 13 राज्यांना पावसाचा इशारा! 80 किमी वेगाने वारे वाहणार? IMD चा अलर्ट

नवी दिल्ली : मान्सूनचा परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात असतानाच देशातील हवामानात मोठी उलथापालथ झाली आहे. भारतीय

Gangotri Dham : हिवाळ्यासाठी गंगोत्री धामचे कपाट 10 नोव्हेंबरला बंद; अन्नकूट पर्वावर होणार धार्मिक विधींसह समारोप

आता तिकीट बुकिंग होणार सोपी! 'या' गाड्यांचे PNR नंबर्स बदलणार

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या तिसऱ्या