मुंबई : भारतीय गुंतवणूकदारांसाठी आता थेट अमेरिकन शेअर बाजारात पैसे गुंतवणे अत्यंत सोपे आणि फायदेशीर झाले आहे. जागतिक स्तरावर पोर्टफोलिओत विविधता आणण्यासाठी आणि एआय, क्लाउड कम्प्युटिंग सारख्या हाय-टेक क्षेत्रांतून तगडा नफा कमावण्यासाठी एंजेल वनने एक भन्नाट सुविधा आणली आहे. GIFT सिटी आणि IFSCA च्या मंजुरीनंतर आता तुम्ही घरबसल्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकता. ही संधी प्रत्येकासाठी फायदेशीर ठरणार आहे.
अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणुकीचा सोपा मार्ग
देशांतर्गत इक्विटी बाजारापलीकडे जाऊन गुंतवणूकदारांचा कल आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांकडे वाढला आहे. एंजेल वनने आपल्या ॲपवर अमेरिकी शेअरमध्ये गुंतवणुकीची सुविधा सुरू केली आहे. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना ॲपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन, एनव्हिडिया यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांसह नेटफ्लिक्स आणि टोयोटाच्या शेअर व ईटीएफमध्ये पैसे गुंतवता येतील.
फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंगचे मोठे आकर्षण
महागातले शेअर्स खरेदी करणे आता अशक्य राहिलेले नाही. 'फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंग'मुळे गुंतवणूकदारांना पूर्ण शेअर न घेता त्याचा अगदी लहान भागही खरेदी करता येईल. ही सेवा सध्या निवडक युजर्ससाठी चालू असून, नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्वांसाठी खुली होईल. कोटक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेद्वारे थेट खात्यात पैसे जमा करता येतील.
Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या दोन दिवसांत ...
शून्य शुल्क आणि डिसेंबरपर्यंत मोफत ब्रोकरेज
गुंतवणूकदारांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, डिसेंबर 2026 पर्यंत कोणतेही ब्रोकरेज शुल्क आकारले जाणार नाही. जानेवारी 2027 पासून प्रति व्यवहार केवळ 0.1 टक्के (किमान 0.99 अमेरिकी डॉलर) ब्रोकरेज लागेल. तसेच खाते उघडणे, देखभाल, पैसे जमा करणे आणि काढणे पूर्णपणे मोफत आहे.
सुरक्षा आणि नियम
ही संपूर्ण गुंतवणूक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) LRS नियमांनुसार होणार आहे. तसेच SIPC अंतर्गत ५ लाख अमेरिकी डॉलरपर्यंतचे संरक्षण गुंतवणूकदारांच्या प्रतिभूतींना मिळणार आहे.