Vegetable storage tips in fridge: तुमचा भाज्या फ्रिजमध्ये ठेऊन सुद्धा खराब होतायत का? जाणून घ्या टिप्स

कोथिंबीर, मेथी, पालक आणि इतर हिरव्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवलयानंतर पण खराब होतायत का? त्यामुळे भाज्या फेकून द्याव्या लागतायत का? तर जाणून घ्या भाज्या ताज्या ठेवण्यासाठी काय कराल...

1/6 कोथिंबीर, मेथी, पालक आणि इतर हिरव्या भाज्या घरी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरलया जातात. पण अनेकदा, बाजारातून ताज्या भाज्या आणल्यानंतर परिणामी, वापरण्यायोग्य भाज्यासुद्धा फेकून द्याव्या लागतात. जर तुमच्या बाबतीत असे होत असेल, तर फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्याच्या पद्धतीत काही बदल करणं गरजेचं आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं.

 

2/6 दुसरीकडे, जास्त आर्द्रतेचा अभावामुळे भाज्या लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे, त्यांना फक्त फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या बराच काळ ताज्या राहतील असं गृहीत धरणे योग्य नाही. बाजारातून कोथिंबीर, मेथी किंवा पालक आणल्यावर प्रथम त्याची पाने तपासा. जर त्यात पिवळी, कोमेजलेली, सडलेली किंवा चिकट पाने असतील तर ती वेगळी करा. अशी पाने एकत्र ठेवलयाने बाकीच्या भाज्या देखील खराब होऊ शकतो. भाज्या तपासून आणि त्यांची साठवणूक करून, खराब झालेले भाग वेळेवर काढून टाकता येतात.

 

3/6 बरेच लोक भाज्या घरी आणल्यावर धुतात आणि लगेचच डब्यात भरतात. जर पानांवर जास्त पाणी राहिले आणि त्या बंद डब्यात ठेवल्यावर आतमध्ये ओलावा साचू शकतो. अशा परिस्थितीत, भाज्या लवकर खराब होण्याची शक्यता असते.

 

4/6 हिरव्या भाज्या फ्रिजमध्ये उघड्या ठेवल्याने त्यांतील ओलावा लवकर कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे, त्यांना योग्य हवा खेळती न ठेवता दमट, हवाबंद पाकिटांमध्ये ठेवल्यामळे समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून भाज्यांसाठी योग्य हवा खेळती राहणारी स्वच्छ भांडी किंवा साठवणुकीच्या पिशव्या वापराव्यात.

 

5/6 भाज्यांची मांडणी अशा प्रकारे करा की, त्यांना पुरेशी जागा मिळेल. शक्य असल्यास, त्यांना फ्रिजमधील भाज्यांसाठी असलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवा आणि फ्रिजचे तापमान योग्य पातळीवर ठेवा. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर भाज्यांकडे दुर्लक्ष करू नका. दर काही दिवसांनी त्यांची स्थिती तपासा. जर कोणतीही पाने पिवळी पडू लागली किंवा मऊ झाली, तर ती वेगळी करा. आधी खरेदी केलेल्या किंवा लवकर खराब होण्याची शक्यता असलेल्या भाज्या आधी वापरा.

 

6/6 अनेकदा, भाज्या स्वस्तात मिळत असताना त्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलया जातात. पण जर त्यांचा घरी नियमित वापर होत नसेल, तर त्या बराच काळ फ्रिजमध्ये पडून राहतात. त्यामुळे, कुटुंबाच्या गरजेनुसार आणि येत्या काही दिवसांच्या जेवणानुसार भाज्या खरेदी कराव्यात. यामुळे अन्नाची नासाडी कमी होते. अन्नपदार्थांचा चांगला वापर करण्यास मदत होऊ शकते.
Comments
Add Comment

Skin Treatment : सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो देण्यासाठी 5 खास स्किन ट्रीटमेंट्स; जाणून घ्या कधी कराव्यात?

दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे

नवरा-बायको दोघेही कमावतात, तरी बचत शून्य? ‘या’ ४ चुका ठरतात कारणीभूत!

घरात नवरा बायको दोघेही कामाला जातायंत पण तरीदेखील महिन्याच्या शेवटी बचत होत नाहीय? याचं कारण फक्त जास्त खर्च

Legal Will: मृत्यूपत्र कसे बनवायचे? किती खर्च येतो, काय आहेत नियम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप...

मुंबई: सध्याच्या घडीला माणसाचा एका मिनिटाचाही भरोसा नाही. आयुष्यात काय अनपेक्षित घडेल हे कोणालाच माहीत नाही.

लग्नाच्या आधी की लग्नानंतर? Term Insurance केव्हा घ्यायचा! 99.9% लोकांना माहितीच नाही; आत्ताच जाणून घ्या

मुंबई: लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये आपण कपडे, दागिने, लग्नाचे ठिकाण, लग्नामध्ये जेवणासाठी कोणकोणता मेन्यू हवा आणि

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Phone Call Anxiety : फोन कॉल आला की वाढते धडधड? जाणून घ्या 'टेलिफोन अँग्झायटी'मागचं नेमकं कारण

फोन वाजला की स्क्रीनवरील नाव बघून अनेक जणांच्या मनात पहिल