मुंबईत बेकायदा बॅनर- फ्लेक्सवर BMCची कारवाई; 52 हजारांहून अधिक पोस्टर्स हटवले, FIR दाखल

शहरातील बेकायदेशीर पोस्टर्स आणि बॅनरविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष मोहिमेंतर्गत मोठी कारवाई केली आहे. यावर्षी आतापर्यंत 52 हजाराहून अधिक बॅनर, फ्लेक्स बोर्ड आणि पोस्टर्स हटवले आहेत.

मुंबई: बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून मुंबई शहरामध्ये बेकायदेशीर बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुंबई शहरातील विविध परिसरांमध्ये 8 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या कारवाईमध्ये बेकायदेशीर बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर यांच्यावर धडक कारवाई केलेली आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर आणि फ्लेक्स होते, या सर्वांवर बीएमसीकडून एकदाच कारवाई केलेली आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतलेला पाहायला मिळत आहे.



शनिवारी BMC अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या बेकायदेशीर बॅनर आणि फ्लेक्सविरोधातील मोहिमेचा एक भाग म्हणून 1 जानेवारी ते 16 ऑक्टोबर दरम्यान मुंबई शहरातून 52,448 बॅनर, फ्लेक्स बोर्ड आणि पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. दरम्यान, बीएमसीकडून 8 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या कालावधीत एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेमध्ये 3537 बेकायदेशीर बॅनर, पोस्टर आणि फ्लेक्स जप्त करण्यात आले. महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, परवाना विभागाकडे आलेल्या तक्रारींच्या आधारे पोलीस ठाण्यांमध्ये चार एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे 333 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.



महापालिकेला नागरिकांकडून बेकायदेशीर बॅनर आणि फ्लेक्स विरोधातल्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत बॅनर तात्काळ हटवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती स्वत: बीएमसीने दिली आहे. अधिकृत जाहिरात बॅनरवर क्यूआर कोड अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावरही महापालिका विचार करत आहे, जेणेकरून त्यांची वैधता सहजपणे पडताळता येईल आणि त्यांना अनधिकृत होर्डिंग्जपासून वेगळे ओळखता येणे सोप्पे होईल. महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील बेकायदेशीर फ्लेक्स बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि स्टिकर्सविरोधात ‘शून्य सहनशीलता’ नावाची मोहीम जाहीर केली आहे. त्या मोहिमेंतर्गतच संपूर्ण मुंबई शहरामध्ये धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, या मोहिमेंतर्गत महापालिकेला शहरात, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या बेकायदेशीर जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, हा प्रमुख उद्देश आहे.

Comments
Add Comment

Weather Update : मुंबईत उष्णतेची लाट कायम; तापमान 35°C पोहोचण्याची शक्यता, हवा गुणवत्ताही खालावली

मुंबई : मुंबईकरांना सध्या तीव्र उष्णता आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत असून, भारतीय हवामान विभागाच्या (IMD)

टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारात जखमी झालेल्या उमेश चव्हाण यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

रविवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर मुंबईतील

मुंबईत मंत्रालयाजवळ बेस्ट बस आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मंत्रालयाजवळ वाय.

Ayodhya Special Train : मुंबई-अयोध्या प्रवासासाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस

Devendra Fadnavis : 'यांचा जो कोणी आका असेल, त्याला लवकरच..' ; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर

Tree Plantation Badlapur : सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला...खासगी इमारतींची मुंबईत

सचिन धानजी, मुंबई मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विस्तारीत मुंबई सागरी किनारी रस्ता(मुंबई