Monday, October 19, 2026

Ayodhya Special Train : मुंबई-अयोध्या प्रवासासाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; जाणून घ्या वेळापत्रक

या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई: दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते अयोध्या कॅन्टदरम्यान अमृत भारत विशेष रेल्वेच्या 24 फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या गाडीचे वेळापत्रक

गाडी क्रमांक 01045 लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कॅन्ट विशेष रेल्वे दर सोमवार आणि शुक्रवार सकाळी 7.35 वाजता एलटीटीहून सुटेल. 19 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत या गाडीच्या 12 फेऱ्या चालविण्यात येतील. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 10.15 वाजता अयोध्या कॅन्ट येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठीही विशेष रेल्वे

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01046 अयोध्या कॅन्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे दर मंगळवार आणि शनिवार दुपारी 1.50 वाजता अयोध्या कॅन्टहून सुटेल. 20 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत या गाडीच्या 12 फेऱ्या होतील. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या स्थानकांवर असणार थांबा

या विशेष रेल्वेगाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुलतानपूर या स्थानकांवर थांबे असतील.

तिकीट आरक्षण कसे कराल?

गाडी क्रमांक 01045 साठी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तिकीट आरक्षण करता येईल. अनारक्षित डब्यांसाठी सामान्य दराने यूटीएस प्रणाली किंवा रेलवन अ‍ॅपद्वारे तिकीट काढता येईल.

रेल्वेगाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक आणि इतर माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ किंवा एनटीईएस अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >