
Mumbai Crime News: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू परिसरात गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या घटनेत टायगरचा चालक आणि एक चाहता जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने टायगर श्रॉफ या हल्ल्यातून बचावला. आरोपींनी मुंबईतून पळ काढू नये, यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे.
मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी
गोळीबार केल्यानंतर आरोपींनी आपली दुचाकी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात सोडून दिली आणि त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पळ काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
Tiger Shroff : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...
मुंबईतून राज्याबाहेर जाणाऱ्या खासगी आणि सरकारी बसची तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची तपासणी केली जात आहे. आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून जाऊ नयेत, यासाठी रेल्वेच्या सामान्य डब्यांवरही पोलिसांचे विशेष लक्ष आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथकांकडून तपास सुरू आहे.
View this post on Instagram
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ जुहू परिसरातील पुष्पा नर्सिंग पार्क भागात फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळ संपल्यानंतर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तो मैदानाबाहेर आला. त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या गाडीभोवती गर्दी केली होती.
याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी टायगरच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार केल्याचे वृत्त आहे. ही घटना काही क्षणांत घडल्याने परिसरात घबराट पसरली. या गोळीबारात टायगरचा चालक आणि एक चाहता जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपींचा शोध सुरू
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. आरोपींनी दुचाकी कुठे सोडली आणि त्यानंतर कोणत्या मार्गाने पलायन केले, याचा शोध घेतला जात आहे. आरोपींची ओळख, हल्ल्यामागील कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक स्पष्टता येईल.






