Thane Coastal Road: ठाणे कोस्टल रोडच्या कामाला वेग! एकाच दिवसात 10 गर्डर उभारले; प्रकल्पाचे 45 टक्के काम पूर्ण

ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची बातमी आहे. कोस्टल रोडच्या कामाला वेग आला असून एकाच दिवसात MMRDA कडून 10 गर्डर उभारण्यात आले आहे.

ठाणे: मुंबई प्रमाणेच, ठाणे शहरातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी MMRDA कडून दुसऱ्या कोस्टल रोडची उभारणी केली जात आहे. ठाण्यातील बाळकुमपासून मुलुंड पूर्वेतील आनंद नगर पर्यंत कोस्टल रोड दोन उभारला जाणार आहे. काम सध्या प्रगतीपथावर आहे. MMRDA कडून ह्या कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात आलं आहे. दरम्यान, MMRDA कडून बुधवारी (14 ऑक्टोबर 2026) ह्या एकाच दिवशी 10 खांब उभारण्याचं महत्त्वाचं काम पूर्ण केलं आहे. ह्यामुळे कामातील अनेक अडचणी दूर झालेल्या आहेत.



MMRDA ने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर 2026 ह्या एकाच दिवसात 10 आय- गर्डर उभारून ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधकामातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, अशी एका अधिकृत निवेदनात माहिती दिली आहे. या कामगिरीने 4 ते 6 गर्डरच्या नेहमीच्या दैनंदिन उत्पादनाचा टप्पा ओलांडला असून, कॉरिडॉरच्या बांधकामात हे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. प्रकल्पातील एकूण काम 45 टक्के पूर्ण झाल्याची माहिती MMRDA कडून देण्यात आलेली आहे. MMRDA च्या प्रकल्प पथकाने एकाच दिवसात 10 आय- गर्डरची उभारणी पूर्ण केली आहे. जी त्यांच्या रोजच्या कामाच्या क्षमतेपेक्षा सर्वाधिक आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे कॉरिडॉरच्या बांधकामाच्या प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती MMRDA ने दिली.


कायमच व्यग्र समजल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यासाठी ठाण्यातील कोस्टल रोड हा एक पर्यायी मार्ग असेल. घोडबंदर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी रस्ते जोडणी सुधारणे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा हा प्रकल्पाचा एक भाग आहे. 13.45 किमी लांबीच्या कॉरिडॉरमुळे घोडबंदर रोडवरील ताण कमी होईल. 13.45 किमी लांबीचा, सहा पदरी, प्रवेश-नियंत्रित कॉरिडॉर खारेगाव टोल नाक्यावरील NH-3 आणि NH-48 ला गायमुखशी जोडेल. पूर्ण झाल्यानंतर, हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या घोडबंदर रस्त्याला एक पर्याय उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा आहे. तसेच, यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि गायमुख यांच्यातील संपर्क सुधारेल अशीही अपेक्षा आहे.



ठाणे कोस्टल रोड प्रकल्प अनेक प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारला जात आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मते, जमिनीवर मोनोपाइल फाउंडेशनसह सिंगल-पाइल, सिंगल-पिअर प्रणाली वापरणारा हा भारतातील पहिला ग्रीनफिल्ड रस्ता प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, नाशिक, गुजरात आणि उत्तर भारताकडे जाणारी वाहतुक अधिक जलद आणि सुरक्षित करेल, यात शंका नाही. या प्रकल्पात 240 मीटर लांबीचा खाडीवरील पूल आणि खारफुटीच्या भागातून जाणाऱ्या 8.11 किमी लांबीच्या उन्नत रोडचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी 40 ते 45 मीटर रुंदीचा एक विकास आराखडा (डीपी) रस्ताही राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे घोडबंदर रस्त्यावरील स्थानिक वाहतूक आणि आंतरशहरी वाहतूक वेगळी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.


ठाणे कोस्टल रोड हा ठाणे रिंग मेट्रो, ठाणे कोस्टल रोड, साकेत-अमाने एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि कासारवडवली-खारभव रोड यांसारख्या भविष्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना जोडला जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nagpur Metro News: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोचा तिसरा टप्पा 55 किमीचा; 10 किमी मार्ग भूमिगत असण्याची शक्यता

नागपूर: नागपूर मेट्रोच्या विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मेट्रोचा पहिला टप्पा सुरू असून दुसऱ्या

Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगात; रामकुंड येथे 51 आणि 31 फुटांचे धर्मध्वज उभारले

Nashik News: नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या

Yavatmal : यवतमाळमध्ये भरधाव कारचा थरार ! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद

यवतमाळ : यवतमाळ शहरातील पिंपळगाव बायपासवर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Nashik Maha Goda Aarti: रामकुंडावर 31 ऑक्टोबरला केली जाणार ‘महा गोदा आरती’, नाशिक जिल्ह्यातील गावकरी घेणार सहभाग

नाशिक: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शुभारंभ केला