Washim Crime News : ऐकावं ते नवलंच ! लग्नासाठी नातीनेच मारला आजीच्या दागिन्यांवर डल्ला , प्रियकरासह...

Washim Crime News : लग्न करण्यासाठी नातीनेच आपल्या आजीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील पिंपळगाव इजारा येथे उघडकीस आली आहे. आजीचे सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने चोरून प्रियकरासोबत फरार झालेल्या नंदिनी रामेश्वर राठोड आणि तिचा प्रियकर रामेश्वर राठोड या दोघांना आसेगाव पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी चांदीचे दागिने, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४६ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



आजीच्या दागिन्यांची चोरी करून प्रियकरासोबत पलायन


मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव इजारा येथील नंदिनी राठोड हिने आपल्या आजी यमुनाबाई चव्हाण यांच्या दागिन्यांची चोरी केली होती. त्यानंतर ती प्रियकर रामेश्वर राठोड याच्यासोबत निघून गेली. प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने तिने हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी आसेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. चोरीच्या घटनेला जवळपास एक महिना उलटल्यानंतर पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात यश आले.



सराफाकडे दागिने विकल्याने तपासाला मिळाली दिशा


तपासादरम्यान चोरीतील काही दागिने अनसिंग येथील एका सराफाकडे विकण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्यानंतर नंदिनी आणि रामेश्वर हे दोघे पिंपरी-चिंचवडमधील म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील सावरदरी येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथे कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे आजीच्या दागिन्यांच्या चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला.



१ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त


आरोपींकडून पोलिसांनी चोरीशी संबंधित विविध वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये अनसिंग येथील सराफाकडे विकलेले ३० तोळे चांदीचे दागिने, अन्य ३२ तोळे चांदी, चांदी विकून मिळालेल्या पैशांतून खरेदी केलेली सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ४६ हजार २९० रुपये असल्याची माहिती आहे.



आसेगाव पोलिसांच्या कारवाईची चर्चा


आजीच्या घरातील दागिन्यांची चोरी करून प्रियकरासोबत निघून गेल्याचा आरोप असलेल्या नातीला आणि तिच्या प्रियकराला शोधून काढण्यात आसेगाव पोलिसांना यश आले आहे. चोरीतील दागिने विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून, नातेसंबंधातील विश्वासाला धक्का देणाऱ्या या प्रकरणाची सर्वत्र दखल घेतली जात आहे.

Comments
Add Comment

Nagpur Metro News: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोचा तिसरा टप्पा 55 किमीचा; 10 किमी मार्ग भूमिगत असण्याची शक्यता

नागपूर: नागपूर मेट्रोच्या विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मेट्रोचा पहिला टप्पा सुरू असून दुसऱ्या

टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारात जखमी झालेल्या उमेश चव्हाण यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

रविवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर मुंबईतील

Aruna Irani : पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी अरुणा ईराणी यांचे कामावर पुनरागमन, भावूक व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, शेवटच्या श्वासापर्यंत..

Aruna Irani : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी यांनी वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगानंतर पुन्हा

Amit Jani: निर्माते अमित जानी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गोळीबारामागील मास्टरमाईंड कोण?

मुंबई: चित्रपट निर्माते अमित जानी यांनी हरियाणातील सोनीपत येथे आपल्या वाहनाचा पाठलाग केल्याची आणि आपल्यावर

अजय देवगणमुळेच चित्रपट मिळतात ? इशिता दत्ताने अखेर मौन सोडलं; म्हणाली, मी…

मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या चित्रपटांच्या संधी आणि त्यामागील ओळखी यावर नेहमीच चर्चा होत असते.

Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगात; रामकुंड येथे 51 आणि 31 फुटांचे धर्मध्वज उभारले

Nashik News: नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या