Tuesday, October 20, 2026

Kartik Sabesh Death: आधी काका, नंतर पुतण्या, प्रसिद्ध तामिळ अभिनेत्याचं 37 व्या वर्षी निधन; कुटुंबीयांवर कोसळला दुहेरी दु:खाचा डोंगर

Kartik Sabesh Passed Away: प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेता कार्तिक सबेश याचं वयाच्या 37 व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेता गेला अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराशी लढत होता, पण अभिनेत्याची ही लढाई अपयशी ठरली आहे.

मुंबई: तामिळ इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेता कार्तिक सबेश याचे सोमवारी रात्री उशिरा निधन झासे आहे. वयाच्या 37 व्या वर्षी कार्तिक सबेशचे काही दुर्धर आजारामुळे निधन झाले आहे. चेन्नईतील एका खासगी रूग्णालयामध्ये अभिनेत्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री, 11.15 वाजता अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त कळताच टॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांकडून आणि दिग्दर्शकांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. सबेश कुटुंबियांवर हा दुहेरी दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यातच कार्तिकच्या काकांचं निधन झालं होतं. त्यांचं नाव देवा असं आहे. त्याचे काका टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांपैकी एक आहेत. संगीत दिग्दर्शक देवा यांचं निधन शनिवारी झालं होतं. काकांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर आता पुतण्याचंही निधन झालं आहे. सबेश कुटुंबीयांवर दुहेरी दुहेरी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देवा यांच्या निधनाच्या दु:खातून सबेश कुटुंबीय बाहेर पडत नाहीत, तेच कार्तिकच्या निधनामुळे सबेश कुटुंब हादरले आहे. कार्तिकच्या चाहत्यांना नक्कीच या बातमीमुळे धक्का बसला असेल.

आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकवर चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी रात्री उशिरा अभिनेत्याची प्रकृती अधिक बिघडत गेली. त्यानंतर सोमवारी रात्री 11.15 च्या सुमारास अभिनेत्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला. कार्तिकच्या पश्चात त्यांची पत्नी राम्या कार्तिक आणि दोन मुली आहेत. एवढ्या कमी वयात कार्तिकचे निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही आणि त्याच्या मित्र मंडळीलाही मोठा धक्का बसला आहे. कार्तिक सबेशची अचानक एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. सोशल मीडियावर टॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांकडून आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

कार्तिक सबेशबद्दल सांगायचे तर, कार्तिक तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक होता. अभिनेत्याने आपल्या सिनेकरियरमध्ये, दमदार अभिनय करत चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. कार्तिक सबेश हे संगीत दिग्दर्शक सबेश मुरली यांचा मुलगा आहे. कार्तिक सबेशचे काका देवा, हे तामिळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक होते. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड 400हून अधिक सिनेमांसाठी संगीत तयार केलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >