Tuesday, October 20, 2026

Mumbai Fire: कुर्ल्यात 12 मजली इमारतीत अग्नितांडव! 5 वर्षांच्या चिमुकल्यासह 9 जखमी; रूग्णावर उपचार सुरू

Kurla Building Fire: मंगळवारी सकाळी कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारतीमध्ये इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 9 रहिवासी जखमी झालेत.

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यामध्ये ऐन दसऱ्याच्या दिवशी आगीची घटना घडली आहे. कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारतीमध्ये आगीची घटना घडली आहे. आगीची घटना ही मंगळवारी सकाळी 06.45 च्या सुमारास घडली आहे. या आगीच्या घटनेमुळे कुर्ला परिसरामध्ये, काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने अचानक पेट घेतल्यामुळे ही आगीची घटना घडली. या आगीच्या घटनेमध्ये नऊ जण जखमी झाले असून घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलमध्ये जखमींवर सध्या उपचार आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आग काही वेळातच आटोक्यात आली असून सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारतीमध्ये इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने अचानक पेट घेतल्यामुळे ही आगीची घटना घडली. आगीमुळे अचानक संपूर्ण इमारतीमध्ये सर्वत्र धुर पसरल्यामुळे इमारतीतील रहिवाश्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ग्राऊंड आणि 12 मजल्यांची ही संपूर्ण इमारत आहे. ऐन सकाळच्या वेळेतच इमारतीच्या वायरिंगला आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये काही वेळासाठी भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. इमारतीतील इलेक्ट्रिक डक्टला आग लागल्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरली. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे इमारतीतील काही मजल्यांवरील लोखंडी दरवाजांचेही मोठे नुकसान झाले. आग आटोक्यात आल्यानंतर बचावकार्याला वेग आला. जरीही आग मोठ्या प्रमाणावर पसरली असली तरीही ती काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक डक्टला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मंगळवारी सकाळी 6.53 वाजता मिळाली. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या जवानांसह, मुंबई पोलीस आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आग नियंत्रणात असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी आग काही मिनिटातच विझवली. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी 7.21 वाजता आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. सर्व जखमींवर सध्या घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयामध्ये, उपचार सुरू आहे. डॉक्टरांकडून सर्व जखमींवर उपचार केले जात असून सर्व रूग्णांची तब्येत सध्या स्थिर आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात सध्या नऊ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 55 वर्षी जाहेद अली शेख यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. 30 वर्षीय इशान अहमद, 5 वर्षांचा चिमुकला मोहम्मद शेख, 27 वर्षीय फरिना बोनो, 65 वर्षीय इजास अहमद, 18 वर्षीय फरिन शेख, 14 वर्षीय नैद्या शेख, 45 वर्षीय कालिमा साहा आणि 17 वर्षीय अलिना शेख हिचा सुद्धा या घटनेमध्ये श्वास गुदमरला होता. या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >