Dussehra 2026 : 'सोनं घ्या सोन्यासारखे राहा!' दसऱ्यानिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला अत्यंत पवित्र सण म्हणजेच विजयादशमी (Dussehraअर्थात दसरा आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शुभदिनी एकमेकांना आपट्याची पाने वाटून 'सोनं' देण्याची आणि एकमेकांच्या सुख-समृद्धीची कामना करण्याची आपली जुनी परंपरा आहे. आजच्या या मंगल प्रसंगी आपण फक्त भेटूनच नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवाराला आणि आप्तस्वकीयांना काहीतरी हटके आणि मनाला भावणारे शुभेच्छा संदेश पाठवून हा दिवस आणखी खास बनवू शकता.



यंदाच्या दसऱ्याला तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे आहेत



  • वाईटावर नेहमी सत्याचाच विजय होतो, हा संदेश देणारा हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन करो. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपट्याची पाने लुटत नातेसंबंध आणखी घट्ट करूया.

  • "घरोघरी आनंद नांदो, प्रगतीचा मार्ग उजळो... आपट्याची पाने लुटत जुने सारे गैरसमज विसरून जाऊया, एकमेकांना सोन्यासारख्या गोड आठवणी देऊया!" माझ्या सर्व मित्र-परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


  • नात्यांमध्ये गोडवा आणि मनात आदराची भावना कायम ठेवणारा हा दसरा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात अपार यश घेऊन आहो. हसत राहा, आनंदी राहा आणि सोन्यासारखे जगा! शुभ दसरा!


  • दसऱ्याचा हा पवित्र दिवस तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा अंत करून विजयाचा नवा मार्ग दाखवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणास आणि आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!


  • "शस्त्रांची पूजा आणि सत्याचा विजय... जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळो. तुमच्या पाठीशी नेहमी यशाची सावली राहो. आपणास आणि आपल्या संपूर्ण कुटुंबास विजयादशमीच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा!"


  • "झाडाची पाने सोन्यासारखी भासतात, जेव्हा ती आपापसात प्रेमाने वाटली जातात. वाईट सवयींचा त्याग करून चांगल्या विचारांचा स्वीकार करूया. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!"


  • "रावण दहनासोबत तुमच्या मनातील सर्व ताणतणाव, राग आणि द्वेष जाळून टाका; आणि नव्या उमेदीने आयुष्याची नवी सुरुवात करा. दसऱ्याच्या या मंगलदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि अमाप धन-धान्य लाभो, हीच सदिच्छा!"


  • "सुख, शांती आणि समृद्धीचा हा दिवस तुमच्या दारी आनंदाची नवी किरणे घेऊन येवो. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला विजय मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी दसरा!"

Comments
Add Comment

Dusshera 2026 : आज विजयादशमी! देवघरातील घट कधी व कसे हलवावे ? जाणून घ्या योग्य विधी आणि परंपरा

शारदीय नवरात्रोत्सवाची (Navratri 2026) सांगता आज म्हणजेच मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात होत आहे. हिंदू

दिल्ली मेट्रो स्थानकात खळबळ : १५५ ग्रॅम सोन्याची पावडर लपवून पळणाऱ्या प्रवाशाला CISFने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मशिद मेट्रो स्थानकावर (Delhi Metro Station) १७ ऑक्टोबर रोजी एक थरारक घटना घडली. सामानाची तपासणी

Tiger Shroff firing case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : सर्व ३ आरोपी १८ ते २२ वयोगटातील, मुंबई गुन्हे शाखेची माहिती

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त (DCP) राज तिलक रोशन यांनी १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले की, अभिनेता टायगर

Airtel Recharge: एअरटेलचे डेटा नसलेले तीन नवे ‘व्हॉइस आणि एसएमएस’ प्लॅन सादर; जिओशी असणार स्पर्धा

मुंबई: मोबाईलवर इंटरनेटचा वापर न करता केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे

रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा; पुतिन यांचा ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यासोबत त्रिपक्षीय शिखर परिषदेचा प्रस्ताव

वॉशिंग्टन: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात

Surya Teaser: सनी पाजीच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'सूर्या'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

मुंबई: सनी पाजीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सनी देओल यांच्या आगामी ‘सूर्या’ या