
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी सोनं खरेदीसाठी बाजारात लगबग असते. पण गेल्या काही वर्षात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणं सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. पण सणासुदीला आणि शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची इच्छा असते. असं असताना थोडं सोनं खरेदी केलं तरी मनाला समाधान लाभतं. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 87 रुपयांनी घसरून 14,717 रुपयांवर आला आहे. दहा ग्रॅम सोन्याचा भाव 870 रुपयांनी कमी होऊन 1,47,170 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 13,490 रुपये (घसरण 80 रुपये) तर 18 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 11,038 रुपये (घसरण 65 रुपये) इतके आहे. दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,34,900 रुपये नोंदवला गेला.
जागतिक बाजारात स्पॉट सोने औंसाला सुमारे 4,145 डॉलरवर स्थिर आहे, तर चांदी औंसाला सुमारे 57.5 डॉलरवर एक टक्क्याने वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही मंगळवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत घट नोंदविण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 14,717 रुपये आणि 22 कॅरेट 13,490 रुपये आहे. पुणे, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादमध्येही 22 कॅरेट सोन्याचा दर हाच आहे, तर दिल्लीत थोडा जास्त प्रति ग्रॅम 13,505 रुपये आहे.
तुम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? सध्या दरांमध्ये झालेली घसरण तुमच्या फायद्याची ठरणार आहे. पण लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे हे दर सतत बदलत असतात.






