INDW vs ZIMW: भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला दिला क्लिन स्विप, तिसऱ्या टी20 सामन्यात 92 धावांनी नमवलं

भारत आणि झिम्बाब्वे महिला संघात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत भारताने तिन्ही सामन्यात विजय मिळवला आणि झिम्बाब्वेला क्लिन स्विप दिला.

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला 3-0 ने पराभूत केलं. स्मृती मंधानाने नेतृत्व हाती घेतल्यानंतर पहिल्याच मालिकेत दणदणीत विजय मिळवला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच 20 षटकात 7 गडी गमवून 216 धावा केल्या आणि विजयासाठी 217 धावांचं आव्हान दिलं. खरं तर हे आव्हान झिम्बाब्वे संघाच्या क्षमतेपलीकडचं होतं आणि भारताचा विजय तेव्हाच निश्चित झाला होता. झालंही तसंच.. भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 92 धावांनी पराभूत केलं आणि मालिका 3-0 ने जिंकली. या फॉरमॅटमध्ये भारताने मायदेशात सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. स्थायी कर्णधार म्हणून स्मृती मंधानासाठी ही एक चांगली सुरुवात आहे.

भारताचा डाव


भारताकडून शफाली वर्मा आणि अनुष्का शर्मा यांनी सुरूवात केली. शफाली वर्माने आक्रमक खेळी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शफाली वर्माने 37 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यात तिने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. तिचा स्ट्राईक रेट हा 186.49 चा होता. अनुष्का शर्माने 20 चेंडूत 28 धावा केल्या आणि बाद झाली. तर निकी प्रसाद फार काही करू शकली नाही. तिने 12 चेंडूत 9 धावांची खेळी केली. पण हरमनप्रीत कौरचा झंझावात यावेळी पाहायला मिळाला. तिने 41 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 91 धावांची खेळी केली. तिच्या या खेळीमुळे भारताने 216 धावांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे, ऋचा घोष 1, दिप्ति शर्मा 0, अरुंधती रेड्डी 4 आणि प्रेमा रावत 4 धावा करून बाद झाले. यावेळी स्मृती मंधाना फलंदाजीला उतरली नाही.


झिम्बाब्वेचा डाव


भारताने विजयासाठी दिलेल्या 217 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला सुरूवातीला धक्का बसला. केलिस न्धलोवू शून्यावर बाद झाली. तर मॉडेस्टर मुपाचिकवा 1 धाव करून तंबूत परतली. शार्न मेयर्स आणि प्रिय बिझा यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटली आणि झिम्बाब्वेचा डाव पुन्हा घसरला. खरं तर हा सामना जिंकणं कठीण होतं. पण कडवी झुंज देणंही झिम्बाब्वेला जमलं नाही. त्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्याच टी20 मालिकेत क्लिन स्विप मिळाला.
Comments
Add Comment

ICC Action : शफाली वर्मावर मोठी कारवाई, एका चुकीमुळे थेट आयसीसीकडून शिक्षा जाहीर

रायपूरच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 सामन्यात एक मोठी आणि खळबळजनक घटना घडली

Cristiano Ronaldo ला मोठा धक्का? 30 दिवसांची बंदी आणि दंडाच्या बातमीने फुटबॉल विश्वात चर्चा, नेमकं प्रकरण काय?

लिस्बन (पोर्तुगाल): जागतिक फुटबॉल विश्वातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. पोर्तुगीज फुटबॉल महासंघाने

WPL 2027: 146 खेळाडूंवर लागणार बोली, पण 27 जणींचं नशिब चमकणार! 28 ऑक्टोबरला लिलाव

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धा जानेवारीत होणार आहे. या स्पर्धेचं हे पाचवं पर्व असून पाचही संघ या स्पर्धेसाठी

Asian Para Games 2026 : दीप्ती जीवनजीची सुवर्णमयी झेप, ५६.३६ सेकंदांत रेकॉर्ड करत पटकावले सोने

जपानमधील ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ (Asian Para Games 2026) मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली दमदार

Hong Kong Sixes 2026: अफगाणिस्तानचे 7 खेळाडू जाहीर; पाहा संपूर्ण संघ

काबुल : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी आपल्या सात सदस्यीय संघाची घोषणा केली

1948 नंतर पहिल्यांदाच! मिझोरमच्या चिन्मय सुतारने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, झळकावले ऐतिहासिक 400 धावांचे तुफानी चौपट शतक

दिमापूर : देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 78 वर्षांनंतर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26