Pankaja Munde : भगवानगडावर पंकजा मुंडेंचा हुंकार ! शेरोशायरीतून जातीय भेदभावावर प्रहार ; दसरा मेळाव्यात नेमकं काय म्हणाल्या ?

 बीड : “जय भगवान, छत्रपती शिवाजी महाराज की जय,” अशा जयघोषाने मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात आपल्या भाषणाची सुरुवात केली. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी भगवानगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाही या मेळाव्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मुंडे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी जातीभेद, सामाजिक एकता, तरुण पिढी, दुष्काळ आणि विकासाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.



‘जातीपातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना भविष्य नाही’


भगवानगडावरील मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी समाजातील जातीपातीच्या भिंती मोडून काढण्याचे आवाहन केले. संत भगवान बाबांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला. “जातीपातीच्या जीवावर मोठे होऊ इच्छिणाऱ्या आणि त्याच आधारावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना भविष्य नाही,” असे त्या म्हणाल्या. समाजामध्ये माणसा-माणसांत भिंती निर्माण करण्याऐवजी त्या दूर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यंदाचा दसरा मेळावा हा सीमोल्लंघनाचे दशक असल्याचे सांगत त्यांनी या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक उपस्थित असल्याचे नमूद केले.



भीड में खड़ा होना मकसद नहीं है मेरा


भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आणि समर्थकांच्या ताकदीचा उल्लेख केला. भगवानगडावर भगवान भक्तीगडाची स्थापना करण्याचा निर्णय आपण क्षणात घेतल्याचे सांगत त्यांनी आपल्या नेतृत्वाचा आत्मविश्वास व्यक्त केला. “ही आजची शक्ती आहे, लेकीची शक्ती आहे, गोपीनाथ मुंडेंच्या लेकीची शक्ती आहे,” असे म्हणत त्यांनी समर्थकांना एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातूनही आपल्या भावना व्यक्त केल्या. “भीड में खड़ा होना मकसद नहीं है मेरा, भीड़ जिसके लिए खड़ी होती है वह बनना है मुझे,” अशी शायरी सादर करत त्यांनी नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.



तरुण पिढीला देशभक्ती आणि संस्कारांचा संदेश


पंकजा मुंडे यांनी तरुण पिढीच्या भूमिकेवरही भाष्य केले. देशाबद्दल आदर आणि देशभक्तीची भावना असलेली तरुण पिढी घडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या पिढीचा उल्लेख करत त्यांनी 'जेन झी' अर्थात तरुण वर्गाला समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. धर्म आणि जातीच्या नावावर समाजात भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. शिक्षण, विचार आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात सकारात्मकता निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.




दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात देणार


राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत पंकजा मुंडे यांनी दुष्काळात गरीब-श्रीमंत किंवा जात-धर्म असा भेद नसतो, असे सांगितले. दुष्काळाचा सामना करताना समाजाने एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “मी मागचा दुष्काळ हाताळला होता, हाही दुष्काळ हाताळू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीएसआर फंडातून मी चारा पोहोचवण्यासाठी, अनुदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करुन सावली बनण्याचं काम करेल, असेही पंकजा यांनी म्हटले.



अंतरवली गावाच्या विकासाचा संकल्प


जालना जिल्ह्यातील अंतरवली गाव दत्तक घेतल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. बीड जिल्ह्यातील गावांच्या विकासासाठी ज्या पद्धतीने काम केले, त्याच धर्तीवर अंतरवलीचा विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच, नदी संवर्धनासाठी प्रत्यक्ष काम करण्याची तयारी दर्शवत त्यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी आणि चारा व्यवस्थापनासह दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता असल्याचा संदेश त्यांच्या भाषणातून देण्यात आला.


भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी समाजातील व्यसनाधीनतेच्या समस्येवरही भाष्य केले. देश व्यसनांच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी नागरिकांना व्यसन सोडण्याचे आवाहन केले.मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करत त्यांनी “लेकीला जन्म घेऊ द्या,” असे आवाहन केले. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक विचार, सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.



शेरोशायरीतून जातीय भेदभावावर प्रहार


पंकजा मुंडे यांनी भाषणात विविध शेरोशायरींचा वापर करत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. “ये पेड़ के पत्ते, शाखें भी परेशान हो जाते, अगर परिंदे भी हिंदू-मुसलमान हो जाते,” अशी शायरी सादर करत त्यांनी जातीय आणि धार्मिक भेदभावावर भाष्य केले. राजकारणात सकारात्मकता असणे आवश्यक असल्याचे सांगत सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी मनात प्रेम, भविष्याची जाणीव आणि चांगले संस्कार असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. दसरा मेळावा हा सर्व समाजाच्या भल्यासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



भगवान बाबांच्या मूर्तीचे पूजन; मुंडे कुटुंबीयांची आरती


दसरा मेळाव्यापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील गर्भगृहात संत भगवान बाबांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी त्यांचा मुलगा आर्यमान मुंडे उपस्थित होता. त्यानंतर व्यासपीठामागे असलेल्या भगवान बाबांच्या मूर्तीसमोर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांनी आरती केली. धार्मिक विधींनंतर मेळाव्याला सुरुवात झाली आणि पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून सामाजिक एकता, दुष्काळ निवारण आणि विकासाचा संदेश दिला.

Comments
Add Comment

Nashik Crime: चांदवडमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 95 हजारांचा गांजा जप्त, दोन आरोपी जेरबंद

नाशिक: नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने गांजा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’; दुष्काळग्रस्तांसाठी ठाण्यातून मदतीचे शेकडो ट्रक रवाना ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत साहित्याला दाखवला भगवा झेंडा

ठाणे : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेच्या माध्यमातून

RSS Vijayadashami 2026: सामाजिक एकता, व्यसनमुक्ती ते AI पर्यंत, मोहन भागवत दसरा मेळाव्यात काय काय म्हणाले ?

RSS Vijayadashami Utsav 2026 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव आणि

Dhamma Chakra Pravartan Din 2026 : मध्य रेल्वेची जय्यत तयारी; नागपूर व अजनी स्थानकांवर अडीच लाख प्रवाशांच्या आगमनाची अपेक्षा

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरला भेट देणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान, 182 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

मुंबई: सध्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदानाची जोरदार चर्चा सुरू आहे. या

Shiv Sena Dasara Melava 2026: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार?

मुंबई: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त