WPL 2027: 146 खेळाडूंवर लागणार बोली, पण 27 जणींचं नशिब चमकणार! 28 ऑक्टोबरला लिलाव

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेपूर्वी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. हा लिलाव कोचीत 28 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी लिलावात 146 खेळाडूंवर बोली लागणार आहे. तर पाच फ्रेंचायझींकडे मिळून फक्त 27 जागा शिल्लक आहेत.

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धा जानेवारीत होणार आहे. या स्पर्धेचं हे पाचवं पर्व असून पाचही संघ या स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी प्रत्येकी दोन वेळा जेतेपद मिळवलं आहे. तर इतर तीन फ्रेंचायझींच्या पदरी निराशा पडली आहे. असं असलं तरी पाचही फ्रेंचायझी येत्या पर्वात जेतेपदासाठी आपली ताकद लावणार आहे. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. ही लिलाव प्रक्रिया 28 ऑक्टोबरला होणार आहे. या लिलावात भारतीय फलंदाज जी कमलिनी, अष्टपैलू स्नेह राणा, ऑस्ट्रेलियाची कर्णधार सफी मोलिन्यू आणि श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू यांच्यासह 146 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण पाचही फ्रेंचायझींच्या मिळून 27 जागा शिल्लक आहेत. म्हणजेच 146 पैकी फक्त 27 जणींचं नशिब चमकणार आहे.

लिलाव प्रक्रियेत कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंची स्थिती काय?


वुमन्स लीग स्पर्धेसाठी पार पडणाऱ्या लिलाव प्रक्रियेतील 146 पैकी 119 खेळाडू हे भारतीय आहेत. यात 22 कॅप्ड आणि 97 अनकॅप्ड खेळाडू आहेत. तर 27 विदेशी खेळाडू आहेत. यात असोसिएट देशांचे सहा खेळाडू आहेत. या यादीत 14 कॅप्ड आणि 13 अनकॅप्ड खेळाडू आहेत. शिल्लक 27 पैकी 20 जागा या भारतीय खेळाडूंसाठी आहेत. तर विदेशी खेळाडूंसाठी सात जागा आहेत. लिलावात सर्वात जास्त बेस प्राईस ही 50 लाख असून यात दोन खेळाडू आहे. इंग्लंडची सोफिया डंकली आणि ऑस्ट्रेलियाची सोफी मोलिन्यू यांची नावं 50 लाख रूपये बेस प्राईस असलेल्या यादीत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोलिन्यू या लिलावापूर्वी रिलीज कंल आहे. तर डंकली 2024 मध्ये गुजरात जायंट्सकडून वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा खेळली होती.



मुंबई इंडियन्सने जी कमलिनी हिला रिलीज केलं आहे. तिची बेस प्राईसही 40 लाख रुपये आहे. या यादीत किरण नवगिरे आणि ऑस्ट्रेलियाची हीथर ग्राहम आणि जेनासन आहे. तर 30 खेळाडूंची त्यांची बेस प्राईस ही 30 लाख रुपये ठेवली आहे. यात दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेली स्नेह राणा आणि श्रीलंकेची चमारी अटापट्टी आहे. तर फक्त तीन खेळाडूंनी 20 लाख ही बेस प्राईस ठेवली आहे. तर उर्वरीत 107 खेळाडूंची बेस प्राईस ही 10 लाख रुपये आहे.


यूपी वॉरियर्सकडे सर्वाधिक पैसे


वुमन्स प्रीमियर लीग मिनी लिलावासाठी यूपी वॉरियर्सकडे सर्वधिक पैसे आहेत. त्यामुळे चांगल्या खेळाडूंवर मोठी बोली लावू शकतात. कारण या फ्रेंचायझीने एकूण 9 खेळाडू रिलीज केले आहेत. यात डिएंड्रा डॉटिन, क्लो ट्रायन आणि किरण नवगिरे यांचं नाव आहे. इतकंच काय तर संघाने तारा नॉरिसला 10 लाख रुपयात मुंबई इंडियन्ससोबत ट्रेड केलं आहे. त्यामुळे यूपी वॉरियर्सकडे 3.75 कोटी रुपये आहे. तसेच सर्वाधिक जागाही त्यांना भरायच्या आहेत. गुजरात जायंट्सकडे 1.25 कोटी, आरसीबीकडे 1.15 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 1.10 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 1 कोटी रुपये शिल्लक आहेत.
Comments
Add Comment

Asian Para Games 2026 : दीप्ती जीवनजीची सुवर्णमयी झेप, ५६.३६ सेकंदांत रेकॉर्ड करत पटकावले सोने

जपानमधील ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ (Asian Para Games 2026) मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली दमदार

Hong Kong Sixes 2026: अफगाणिस्तानचे 7 खेळाडू जाहीर; पाहा संपूर्ण संघ

काबुल : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी आपल्या सात सदस्यीय संघाची घोषणा केली

1948 नंतर पहिल्यांदाच! मिझोरमच्या चिन्मय सुतारने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, झळकावले ऐतिहासिक 400 धावांचे तुफानी चौपट शतक

दिमापूर : देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 78 वर्षांनंतर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26

BCCI Selection Committee: प्रज्ञान ओझा यांची पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; रमेश पोवार यांचीही एंट्री

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी प्रज्ञान ओझा यांची पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, तर

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

टीम इंडियाच्या मालिका विजयाचं गणित पावसामुळे भंगलं, पण कर्णधार श्रेयस अय्यरला मिळालं खास मेडल; कारण..

[caption id="attachment_1067421" align="aligncenter" width="800"] भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. पण या