Nashik Kumbh Mela : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळ्याचे खास निमंत्रण ! पेटी उघडताच उलगडणार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वैभवशाली वारसा

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर तयारी सुरू आहे. ३१ ऑक्टोबरचा ध्वजारोहण सोहळा हा या पर्वातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्याबरोबरच कुंभमेळ्याची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख देशासमोर मांडण्याचा प्रयत्न या विशेष निमंत्रणातून करण्यात आला आहे.

Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवन येथे भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. या निमंत्रणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ कार्यक्रमाचे आमंत्रण नव्हे, तर महाराष्ट्राची संस्कृती, गोदामाईचा महिमा आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे आध्यात्मिक वैभव दर्शविणारी एक खास कलात्मक भेटवस्तू राष्ट्रपतींना देण्यात आली आहे.



पेटी उघडताच उलगडणार कुंभमेळ्याचे वैभव


राष्ट्रपतींना देण्यात आलेले निमंत्रण एका अनोख्या कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रणाची पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, धार्मिक महत्त्व आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय अर्थात पॉप-अप कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श अशा पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांची संकल्पना या निमंत्रणातून मांडण्यात आली आहे. नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरी नदीचे महत्त्व आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे स्थान यांची अनोखी झलक या कलाकृतीतून साकारण्यात आली आहे.


 


ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे निमंत्रण


३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याबरोबरच गोदा आरती, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि कुंभमेळा टपाल तिकिटाचे अनावरण अशा कार्यक्रमांसाठीही राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर आणि त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



आदिवासी उद्योजकतेला विशेष स्थान


या भेटवस्तू संचात आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या विविध उत्पादनांचाही समावेश करण्यात आला आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू आणि वनमध अशा वस्तूंतून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक उद्योजकतेचे सामर्थ्य अधोरेखित करण्यात आले आहे. आदिवासी कारागिरांचे कौशल्य, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आणि आर्थिक सक्षमीकरणाचा संदेशही या भेटवस्तूंच्या माध्यमातून देण्यात आला आहे.



पैठणीपासून नाशिकच्या चिवड्यापर्यंत


महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेचे प्रतीक असलेल्या येवला येथील पैठणीचा या भेटवस्तू संचात समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतीक म्हणून काळे मनुके आणि काजू, तर स्थानिक खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणून प्रसिद्ध नाशिकच्या चिवड्यालाही स्थान देण्यात आले आहे. याशिवाय निवडक मिठाई आणि सुकामेव्याचाही समावेश आहे. त्यामुळे या भेटवस्तू संचातून महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, हस्तकला, कृषीवैभव, खाद्यसंस्कृती आणि आदिवासी समाजाचे योगदान यांचा संगम पाहायला मिळतो.



सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग


नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर तयारी सुरू आहे. ३१ ऑक्टोबरचा ध्वजारोहण सोहळा हा या पर्वातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्याबरोबरच कुंभमेळ्याची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख देशासमोर मांडण्याचा प्रयत्न या विशेष निमंत्रणातून करण्यात आला आहे. गोदामाईचा महिमा, कुंभमेळ्याचे आध्यात्मिक वैभव आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा एका कलात्मक निमंत्रणातून राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्याचा हा अनोखा प्रयत्न ठरत आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध सुवर्णकार थिरु वुमिडी एथिराज यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली

भारताचे प्रसिद्ध सुवर्णकार आणि कारागीर थिरु वुमिडी एथिराज यांचे बुधवारी (२१ ऑक्टोबर २०२६) चेन्नई येथे वयाच्या

HDFC बँकेत खळबळ! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती लीक?

बाजारमूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी (HDFC)बँकेच्या अंतर्गत चौकशीत, दोन वरिष्ठ

Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार, रेल्वेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

रील बनवण्याच्या नादात चिमुकलीचा जीव धोक्यात? समुद्राच्या लाटांमधून अनोळखी व्यक्तीने वाचवलं; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आपण किती निष्काळजी होऊ शकतो, याची जाणीव करून देणारा एक व्हिडिओ सध्या

Vijayadashami 2026: दसऱ्याचा सण, विजयाचा संकल्प; राष्ट्रपती आणि पंतप्रधान काय म्हणाले?

नवी दिल्ली: आज देशभरात विजयादशमीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. या मंगल प्रसंगी राष्ट्रपती

लखनऊ-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात, ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या पिकअपची डिव्हायडरला धडक, दोघांचा मृत्यू

लखनऊ–प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावरील दखिना टोल प्लाझाजवळ तीन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताचे