
France Protest : फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि लुटमार सुरू आहे. पॅरिससह दहा शहरांमध्ये हिंसाचार उसळला. आंदोलन खरं तर शांततेत सुरू होतं, पण त्याला हिंसक वळण लागल्याने शंकेला कारण आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये लोकं शांततेत आंदोलन करत होती. पण काही चेहरे झाकलेल्या हिंसक गटांनी या आंदोलनला हिंसक रूप दिलं. हिंसक आंदोलनाचा रेम्स, मार्सेल, बोर्डो आणि लिल या शहरांना सर्वाधिक फटका बसला.इतकंच काय तर सार्वजनिक इमारतींना लक्ष्य केलं. यात लिमोजमधील ऐतिहासिक सिटी हॉल जवळजवळ जाळून टाकण्यात आली, मार्सेलच्या सिटी हॉलची तोडफोड केली आणि ल्योनचे पर्यटन कार्यालय जाळण्यात आले. आलिशान बुटीक, सुपरमार्केट आणि ॲपल स्टोअर्ससह दुकाने लुटण्यात आली. त्यामुळे इतकी वर्षे ऐतिहासिक वारसा जपला त्याचं नुकसान झालं आहे.
Share Market News: भारतीय शेअर बाजारात बुधवारी, 21 ऑक्टोबर रोजी सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसत असतानाच, रिलायन्स ...
हिंसाचार आणि जाळपोळीनंतर फ्रान्सचे नागरिक दुखी
फ्रेंच लोक त्यांच्या इतिहासाबद्दल आणि वारशाबद्दल अत्यंत जागरूक आणि संवेदनशील आहेत. हिंसक जमावाने आंदोलनाच्या आडून ऐतिहासिक वारशाची नासधूस केल्याचं पाहून त्यांना अत्यंत दु:ख झालं. अर्धवट जळालेल्या इमारतीसमोर झालेली नासधूस पाहण्यासाठी शेकडो लोक दुसऱ्या दिवशी जमले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. परिस्थिती इथपर्यंत कशी पोहोचली हे आम्हाला समजत नाही, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी शहराच्या 'प्लेस दे ला रिपब्लिक' येथे एक रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यात शहर प्रशासनाच्या अंदाजानुसार सात हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.हिंसाचारामुळे मूळ चर्चा भरकटल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
'पॅरीस लवकरच मुस्लीम शहर होणार', ट्रम्प यांचा दावा
पॅरिस लवकरच एक मुस्लिम शहर बनेल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसाचारानंतर केला आहे. यासाठी त्यांनी फ्रान्सच्या स्थलांतर धोरणांना जबाबदार धरले. जर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्थलांतराबाबतचा त्यांचा सल्ला मानला असता, तर असा हिंसाचार आणि अशांतता टाळता आली असती, असा दावाही त्यांनी या निमित्ताने केला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "तो माझा मित्र आहे. मी त्याला खूप पूर्वीच सांगितले होते की, तुम्ही फ्रान्समध्ये खूप मोठी चूक करत आहात." ट्रम्प यांनी असा आरोप केला की, स्थलांतरितांच्या ओघामुळे फ्रेंच राजधानीची लोकसंख्याशास्त्रीय रचना लक्षणीयरीत्या बदलली आहे.






