France Protest : आंदोलनाच्या आगीत ऐतिहासिक वास्तू भस्मसात; फ्रेंच नागरिकांमधून तीव्र संताप आणि दुःख

फ्रान्समध्ये शनिवारी झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला. यात राजधानी पॅरिससह देशभरातील विविध इमारतींमध्ये जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना घडल्या. या जाळीपोळीमुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींचं नुकसान झालं आहे.

 France Protest :  फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि लुटमार सुरू आहे. पॅरिससह दहा शहरांमध्ये हिंसाचार उसळला. आंदोलन खरं तर शांततेत सुरू होतं, पण त्याला हिंसक वळण लागल्याने शंकेला कारण आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये लोकं शांततेत आंदोलन करत होती. पण काही चेहरे झाकलेल्या हिंसक गटांनी या आंदोलनला हिंसक रूप दिलं. हिंसक आंदोलनाचा रेम्स, मार्सेल, बोर्डो आणि लिल या शहरांना सर्वाधिक फटका बसला.इतकंच काय तर सार्वजनिक इमारतींना लक्ष्य केलं. यात लिमोजमधील ऐतिहासिक सिटी हॉल जवळजवळ जाळून टाकण्यात आली, मार्सेलच्या सिटी हॉलची तोडफोड केली आणि ल्योनचे पर्यटन कार्यालय जाळण्यात आले. आलिशान बुटीक, सुपरमार्केट आणि ॲपल स्टोअर्ससह दुकाने लुटण्यात आली. त्यामुळे इतकी वर्षे ऐतिहासिक वारसा जपला त्याचं नुकसान झालं आहे.



हिंसाचार आणि जाळपोळीनंतर फ्रान्सचे नागरिक दुखी



फ्रेंच लोक त्यांच्या इतिहासाबद्दल आणि वारशाबद्दल अत्यंत जागरूक आणि संवेदनशील आहेत. हिंसक जमावाने आंदोलनाच्या आडून ऐतिहासिक वारशाची नासधूस केल्याचं पाहून त्यांना अत्यंत दु:ख झालं. अर्धवट जळालेल्या इमारतीसमोर झालेली नासधूस पाहण्यासाठी शेकडो लोक दुसऱ्या दिवशी जमले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. परिस्थिती इथपर्यंत कशी पोहोचली हे आम्हाला समजत नाही, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी शहराच्या 'प्लेस दे ला रिपब्लिक' येथे एक रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यात शहर प्रशासनाच्या अंदाजानुसार सात हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.हिंसाचारामुळे मूळ चर्चा भरकटल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.



'पॅरीस लवकरच मुस्लीम शहर होणार', ट्रम्प यांचा दावा


पॅरिस लवकरच एक मुस्लिम शहर बनेल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसाचारानंतर केला आहे. यासाठी त्यांनी फ्रान्सच्या स्थलांतर धोरणांना जबाबदार धरले. जर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्थलांतराबाबतचा त्यांचा सल्ला मानला असता, तर असा हिंसाचार आणि अशांतता टाळता आली असती, असा दावाही त्यांनी या निमित्ताने केला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "तो माझा मित्र आहे. मी त्याला खूप पूर्वीच सांगितले होते की, तुम्ही फ्रान्समध्ये खूप मोठी चूक करत आहात." ट्रम्प यांनी असा आरोप केला की, स्थलांतरितांच्या ओघामुळे फ्रेंच राजधानीची लोकसंख्याशास्त्रीय रचना लक्षणीयरीत्या बदलली आहे.

Comments
Add Comment

Colombia Mining Accident: सोन्याच्या हव्यासातून भीषण दुर्घटना? कोलंबियात खाण कोसळली; 14 जणांचा मृत्यू

बोगोटा : नारिन्यो भागात घडलेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा अवैध खाणकामांचा धोका आणि तिथल्या भीषण वास्तवावर

रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा; पुतिन यांचा ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यासोबत त्रिपक्षीय शिखर परिषदेचा प्रस्ताव

वॉशिंग्टन: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात

थरारक घटना! तेल अवीवहून व्हिएन्ना जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी; बल्गेरियामध्ये इमर्जन्सी लँडिंगमुळे खळबळ

सोफिया: आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांबाबत सुरक्षा यंत्रणा नेहमीच सतर्क असतात. प्रवाशांच्या सुरक्षेला

Canada Military Base Fire : कॅनडाच्या लष्करी तळावर भीषण आग; चार सैनिकांचा मृत्यू, अनेक गंभीर

ओटावा (कॅनडा): कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील कॅनेडियन फोर्सेस बेस वेनराइट या महत्त्वाच्या लष्करी तळावर शनिवारी

White House : अवघ्या पाच दिवसांत केटी झकारिया यांची व्हाइट हाऊसमधून एक्झिट; बार परीक्षा वादामुळे पद गमावले!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून

Singapore Haze 2026 : इंडोनेशियातील आगीचा सिंगापूरला फटका; प्रदूषणावर कंपन्यांवर होणार कारवाई?

सिंगापूर : इंडोनेशियातील जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या धुरामुळे शेजारील सिंगापूरमधील हवा अत्यंत विषारी