IND vs NZ: पहिल्या टी20 सामन्यात 7 धावा करताच इशान किशन रचणार इतिहास, रिझवानचा विक्रम मोडणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. ही मालिका 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत इशान किशनच्या रडारवर एक दोन नाही तर तीन विक्रम आहे. चला जाणून घेऊयात..

1/6 न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका होत आहे. ही मालिका इशान किशनसाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तीन मोठे विक्रम प्रस्थापित करण्याच्या जवळ आहे. (Photo: ANI)

2/6 टी20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल. या मालिकेत इशान किशन इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. एका कॅलेंडर वर्षात भारतीय खेळाडूने केलेल्या सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावांचा सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडण्यापासून इशान किशन फक्त 7 धावा दूर आहे. (Photo: ANI)

3/6 सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 1164 टी20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. आता हा विक्रम न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मोडण्याची शक्यता आहे. कारण इशानने यावर्षी आतापर्यंत 34 टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 1158 धावा केल्या आहेत. (Photo: ANI)

4/6 इशान किशन कसोटी खेळणाऱ्या देशाच्या फलंदाजांच्या यादीत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रमही मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. हा विक्रम सध्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. रिझवानने 2021 मध्ये 1326 धावा केल्या होत्या. हा टप्पा गाठण्यासाठी ईशानला आणखी 139 धावांची गरज आहे. (Photo: ANI)

5/6 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी इशान किशनला फक्त 46 धावांची गरज आहे. अशी कामगिरी करताच सातवा भारतीय फलंदाज ठरेल. इशानने 66 सामन्यांमध्ये 31.51 च्या सरासरीने आणि 148.81 च्या स्ट्राइक रेटने 1954 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo: ANI)

6/6 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पलीकडे इशान आणखी एक विक्रम रचू शकतो. एका कॅलेंडर वर्षात 2000 टी20 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतो. यासाठी त्याला फक्त 240 धावा पाहीजेत. त्याच्या नावावर आता 1760 धावा आहेत. आतापर्यंत फक्त वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने 2024 या वर्षी 2331 धावा केल्या आहेत. वर्ष संपण्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध पाच टी20 आणि डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका आहे. (Photo: ANI)

 
Comments
Add Comment

IND vs NZ 1st T20 Live Streaming : भारत न्यूझीलंड टी20 मालिका कुठे पाहता येणार? A to Z डिटेल्स जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबरपासून होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत रोहित-विराट खेळणार की नाही? बीसीसीआय अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया समोर

[caption id="attachment_1068135" align="aligncenter" width="800"] विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना वारंवार एक धाकधूक लागली आहे. वनडे

Ranji Trophy Elite 2026-27: मुंबईची हिमाचल प्रदेशवर सरशी, सरफराज खान ठरला विजयाचा हिरो

रणजी ट्रॉफी 2026-27 स्पर्धेचं पर्व सुरू आहे. या स्पर्धेत मुंबई आणि हिमाचल प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या

वाघ शिकार करणं सोडत नाही...! आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी गांगुली-युवराजनंतर दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक डाव

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्सनंतर दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी कमनशिबी आहे. एकदाही जेतेपदावर नाव

U19 Women's T20 World Cup 2027 : 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2027 चा महासंग्राम जाहीर, जाणून घ्या भारताचे वेळापत्रक

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे! आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी 19

Asian Para Games 2026: भारताची पदकांची लय कायम! खेळाडूंनी गाजवलं मैदान; जाणून घ्या गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ जिंकणाऱ्या भारतीयांची नावे

नागोया (जपान) : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी