वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत रोहित-विराट खेळणार की नाही? बीसीसीआय अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया समोर
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघ बांधणी करत असताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय? असा प्रश्न कायम विचारला जात आहे. विराट कोहली या संघाचा भाग असेल यात काही शंका नाही. पण रोहित शर्माचं काय? असं असताना बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
October 21, 2026 08:07 PM
1/5 विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना वारंवार एक धाकधूक लागली आहे. वनडे मालिकेसाठी जेव्हा जेव्हा संघाची निवड केली जाते तेव्हा रोहित-विराटचं नाव आहे की नाही? यावरून चर्चा रंगते. रोहित-विराट यांची न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झाली आहे. पण पुढे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. (Photo: ANI)
2/5 विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवडीवर बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी आपलं मत ठेवलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, संघात निवडीसाठी खेळाडूंच्या वयापेक्षा फिटनेस आणि कामगिरी महत्त्वाची आहे. पण त्यांच्या या वक्तव्यावरून दोन्ही खेळाडू वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार की नाही? हे अद्याप अस्पष्ट आहे. (Photo: ANI)
3/5 रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता दोघेही फक्त वनडे क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे दोघांना 2027 च्या विश्वचषकापर्यंत फिटनेस टिकवून ठेवणे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणे महत्त्वाचे ठरेल. (Photo: ANI)
4/5 न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही दोघांच्या कामगिरीचे बारकाईने निरीक्षण केले जाईल. मात्र, विश्वचषकासाठी त्यांची निवड केवळ एका मालिकेवर अवलंबून राहणार नाही. अंतिम निर्णय निवड समितीकडून खेळाडूंचं फिटनेस, कामगिरी आणि संघाच्या गरजा यांवर आधारित असणार आहे. (Photo: ANI)
5/5 एप्रिल 2027 मध्ये रोहित शर्मा 40 वर्षांचा होईल, तर विश्वचषक स्पर्धेच्या वेळी विराट 38 वर्षांचा असेल. आता दोघांनी पुढील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे ध्येय ठेवतील. आता या एका वर्षाच्या कालावधीत त्याचं फिटनेस महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo: ANI)