द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनमोल भेट; काय आहे पैठणीचं वैशिष्ट्य?

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना, काल (२१ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज्याचे कुंभाचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला गेले. यावेळी ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाचे आमंत्रण राष्ट्रपतींना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या काही भेट्वस्तूदेखील त्यांना देण्यात आल्या. यामध्ये येवला येथील पैठणी साडीचा समावेश असल्याने महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वस्त्र परंपरेकडे लक्ष वेधून घेतले आहे.


नाशिक जिल्ह्यातील येवला हे आता पैठणी विणकामाचे प्रमुख केंद्र आहे. या साडीला तिचे नाव शेजारच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीकिनारी असलेल्या पैठण या प्राचीन गावावरून मिळाली आहे, जे प्राचीन काळात प्रतिष्ठान म्हणून ओळखले जायचे. केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वस्त्र समितीने २००८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पैठणी साड्या आणि पोशाख साहित्याचा अभ्यास व दस्तऐवजीकरण या अहवालात पेशवेकालीन नोंदींचा आधार घेऊन तेथे उत्पादित होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्त्रांचे आणि मराठा उच्चभ्रू वर्गातील त्यांच्या स्थानाचे दस्तऐवजीकरण केले आहे. ७ जानेवारी १७६४ रोजीच्या एका पत्रात, मल्हारराव होळकर यांनी पेशव्यांनी लग्नाची भेट म्हणून पाठवलेल्या वस्त्रांचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये 'पैठणी' ब्रोकेड्सचाही समावेश होता. १ एप्रिल १७६५ रोजीच्या एका पत्रात, पेशवे माधवराव यांनी नाना फडणवीस यांना पैठणमध्ये तयार केलेली रेशमी-सुती धोतरांची दहा जोड पाठवण्यास सांगितले होते. डिसेंबर १७६६ मध्ये, माधवरावांनी 'असावली' नक्षीकाम असलेली, सोने-चांदीच्या जरीची किनार असलेली धोतरे मागवली होती. त्याच महिन्यातील आणखी एका पत्रात, गडद लाल, गुलाबी, गडद हिरव्या आणि केशरी रंगांच्या दुपट्ट्यांसाठी 'असावली' नक्षीच्या काठांचा विशेष उल्लेख आढळतो.


prahaar.in/2026/10/22/concerns-over-drought-lead-to-a-2-decline-in-vehicle-registrations-total-registrations-in-maharashtra-during-the-navratri-and-dussehra-period-reach-1-12-lakh/

पैठणीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कापडात नक्षी विणण्याची पद्धत. पारंपारिकरित्या रेशीम आणि जरीपासून बनवलेली ही पैठणी तिच्या भरजरी काठासाठी आणि पदरासाठी ओळखली जाते. नक्षीच्या गुंतागुंतीमुळे साडी विणायला लागणारा वेळ आणि तिची अंतिम किंमत प्रभावित होते. स्थानिक व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार, आज हा व्यवसाय येवला तालुक्यातील २०,००० हून अधिक विणकरांना रोजगार देतो, ज्यांपैकी बहुतांश विणकर येवला शहरातच कार्यरत आहेत. एका पारंपरिक हाताने विणलेल्या पैठणी साडीची किंमत १५,००० रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत असू शकते; हे मूल्य साडीच्या डिझाइनची गुंतागुंत आणि ती तयार करण्यासाठी लागणारा वेळ यावर अवलंबून असते.

Comments
Add Comment

विद्याविहार, शीव आणि गोरेगावमधील वाहतूक कोंडी फुटणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण; ‘५९ मिनिटांत मुंबई’चे उद्दिष्ट दृष्टिपथात

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासामुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ हे उद्दिष्ट साध्य

Devendra Fadnavis : वाढवण बंदरानजीक रासायनिक उद्योगांचे मोठे केंद्र उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : जागतिक रासायनिक उत्पादन क्षेत्रात भारताला महत्त्वाचे स्थान मिळविण्याची संधी असून, संशोधन, आधुनिक

Vehicle Registrations: वाहन खरेदीलाही दुष्काळाचा फटका; पुणे आघाडीवर, मुंबईत किती वाहनांची नोंदणी किती?

मुंबई: साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसरा सण अलीकडेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरा केला. दसरा सणाच्या

पूर्व महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना; पायाभूत प्रकल्पांसाठी 6.17 कोटी मेट्रिक टन राखेच्या वापराचा ऐतिहासिक सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

एसटी बसस्थानकं चकाचक ठेवण्याची जबाबदारी विभाग नियंत्रकांचीच; अस्वच्छतेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना

सामायिक सातबारा जमीन विक्रीबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, नेमक काय ते वाचा..

मुंबई: महाराष्ट्रात सामाईक नावे असलेल्या 7/12 जमिनींच्या हिस्से विक्रीवरून सहहिस्सेदारांमध्ये निर्माण होणारे