Rashmika Mandana: बोल्ड सीन्स आणि अंग प्रदर्शनाबद्दल रश्मिका मंदाना जरा स्पष्टच बोलली; म्हणाली, "लाज वाटते पण..."

रश्मिका आणि विजय जेव्हा 'कॉफी विथ करण' चॅट शोमध्ये गेले होते, त्यावेळी राम चरणच्या 'पेद्दी' चित्रपटातील जान्हवी कपूरच्या भूमिकेभोवतीच्या वादाच्या विषयावर चर्चा झाली होती. याच विषयाला अनुसरून करणने रश्मिकाला "तू बिकनी सीन किंवा बोल्ड सीन्ससाठी स्वत:वर काही निर्बंध लावलेस का?" असा प्रश्न विचारला होता.

1/7 टॉलिवूड कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अलीकडेच 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. 'रणबाली' चित्रपटाच्या निमित्ताने हे स्टार कपल ह्या चॅट शोमध्ये आलं होतं. यावेळी करणने रश्मिका आणि विजयला खासगी आयुष्यासह करियरबाबतीत सुद्धा प्रश्न विचारले.

2/7 टॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीतील अभिनेत्रींमध्ये रश्मिकाचा समावेश होतो. तिची अभिनय शैली, फिटनेस आणि सौंदर्य या गोष्टींमुळे तिला अनेकदा चित्रपटांमध्ये घेतले जाते. सर्वच शैलीतील भूमिका अगदी सहज साकारणाऱ्या रश्मिकाने आजवर ऑनस्क्रिन केव्हाच बोल्ड सीन किंवा बिकनी सीन दिलेले नाही, याबद्दल तिला करणने प्रश्न विचारला होता.

3/7 राम चरणच्या 'पेद्दी' चित्रपटातील जान्हवी कपूरच्या भूमिकेभोवती सुरू असलेल्या वादाचा विषय निघाला. चित्रपटातील काही सीन्समधील मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जान्हवीसोबत 'पेद्दी' चित्रपटातील काही फोटोस व्हायरल झाल्याची घटना घडल्यानंतर तू बिकनी सीन किंवा बोल्ड सीन्ससाठी स्वत:वर काही निर्बंध लावलेस का?

4/7 या प्रश्नावर उत्तर देताना रश्मिका म्हणाली की, "होय, मला काही गोष्टी करण्यासाठी संकोच वाटतो. निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना आधीच स्पष्ट सांगते की, "मी काही भूमिकांसाठी बिकनी घालण्यासाठी किंवा बोल्ड सीन्स करण्यासाठी कम्फर्टेबल नाही. कमर्शियल चित्रपट करताना सुद्धा बऱ्याचदा काही आऊटफिट्स असतात, जे घालताना अनकम्फर्टेबल वाटतं. म्हणूनच मी स्वत:साठी मर्यादा आखल्या आहेत."

5/7 "अनेकदा माझ्या अटी दिग्दर्शकांना- निर्मात्यांना आवडतात, मी त्यांच्यासोबतच काम करते." रश्मिकानंतर विजयनेही या मुद्द्यावर आपलं मत मांडलंय. तो म्हणाला, "या मुद्द्यावर बोलणं आणि काम करणं आव्हानात्मक आहे." विजय बोलत असताना रश्मिकानेही मान डोलवली. "निर्मात्यांना- दिग्दर्शकांना बोलताना कलाकार मोकळेपणाने बोलू शकतील. मनामध्ये काहीही न ठेवता बोलायला यायला हवं", असं रश्मिका म्हणाली.

6/7 "मला बऱ्याचदा बोल्ड सीन्सबद्दल बोलताना मोकळेपणाने बोलता येत नाही. मलाही बोलताना खूप अवजड जातं. मी अनेकदा विजयला, असं बोलू का? तसं बोलू का? असं विचारत असते." असं रश्मिका म्हणाली. रश्मिकाच्या मुद्द्याला जोडून पुढे विजय म्हणाला की, "त्या सर्वांना अशा सपोर्टची आवश्यकता आहे, जे त्यांना सांगतील की, तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहाल आणि 'नाही' बोलणं खूपच सहज आहे."

7/7 "अनेकदा लोकं तुम्हाला तुम्ही अभिनेत्री असल्याची जाणीव करून देतात. तुम्ही चित्रपट साईन केलाय, हे तुमचं काम आहे. तुमच्यावर दबाव टाकून तुम्हाला प्रोफेशनल नसल्याचा संशय घ्यायला तुम्हाला भाग पाडतात." असं मत सुद्धा विजयने चॅट शोमध्ये मांडलं.
Comments
Add Comment

'Janak' Marathi Movie: सायली संजीवच्या नव्या भूमिकेची चर्चा! ‘जनक’मधून उलगडणार बाप-लेकीच्या नात्याची कहाणी

ज्या बापाने लेकीसाठी आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम दिलं, त्याच बापावर जेव्हा आरोपांचं सावट येतं, तेव्हा त्याच्या

Bigg Boss Season 20: या विकेंडला रोहित शेट्टी घेणार सदस्यांची शाळा; सलमान खान का राहणार गैरहजर?

बिग बॉस सीजन २० च्या मंचावर शोचा होस्ट सलमान खानने एक मोठी घोषणा केली आहे. या विकेंडला शोचा होस्ट बदलणार असल्याचं

Ranbir Kapoor : 'बुराई चाहे कितनी भी..."; दसरा कार्यक्रमातील वक्तव्यावरून रणबीर कपूर ट्रोल

Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, दसऱ्यानिमित्त

Ramayana Movie : 'रामायण’मध्ये साई पल्लवीच सीतेच्या भूमिकेसाठी योग्य ! यशने सांगितलं निवडीमागचं कारण, अभिनेत्रीचं केलं भरभरून कौतुक

मुंबई : भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू

Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या घरी चिमुकल्या परीचे थाटात स्वागत ! लेकीची पहिली झलक पाहून चाहतेही भारावले

Suraj Chavan : आपल्या साध्या स्वभावामुळे, खास बोलण्याच्या शैलीमुळे आणि ‘गुलिगत’ अंदाजामुळे लोकप्रिय झालेला ‘बिग बॉस

Amitabh Bachchan: बिग-बी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पोस्ट का होते आहे व्हायरल

रविवारी रात्री अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. त्यात सात गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारातून