
क्राईस्टचर्च येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी20 सामना सुरू आहे. या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला खेळण्याची संधी मिळाली. खरं तर हा भुवनेश्वर कुमारचा कमबॅक सामना आहे. भुवनेश्वर कुमारने चार वर्षांनी भारतीय संघात कमबॅक केलं आहे. तसेच पहिले चेंडू निर्धाव टाकत विक्रम रचला. पहिल्या षटकात दोन निर्धाव चेंडू टाकत 4 धावा दिल्या. पण त्यानंतरच्या षटकात एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला. दुसऱ्या षटकात त्याने कधीही न केलेली एक चूक केली. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एक छोटा डाग लागला आहे. भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो बॉल टाकला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भुवनेश्वर कुमारचा पहिलाच नो बॉल होता. भुवनेश्वर कुमारने 299.3 चेंडूंनंतर पहिल्यांदाच नो बॉल टाकला. यासह विश्वविक्रम रचण्याची मोठी संधी त्याच्या हातून हुकली.
टी20 नो बॉल न टाकता सर्वाधिक षटकं टाकणारे गोलंदाज
भुवनेश्वर कुमारकडे इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदचा विश्वविक्रम तोडण्याची संधी होती. आदिल रशीदने 320.2 षटकानंतर नो बॉल टाकला होता. भुवनेश्वर कुमारला हा विक्रम मोडण्याची संधी होती. पण 299.3 चेंडूनंतर नो बॉल पडला आणि विक्रम हुकला. पण वेगवान गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार नंबर 1 गोलंदाज आहे. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारला नो बॉल टाकल्याचा फटका बसला. कारण पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाला आणि साइफर्टने चौकार मारला. या षटकात भुवनेश्वर कुमारने एकूण 17 धावा दिल्या.
भुवनेश्वर कुमारसाठी कमबॅकचा पहिलाच सामना महागात पडला. कारण त्याने चार षटकं टाकली आणि एकही विकेट मिळाला नाही. उलट सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 12.25 च्या इकोनॉमी रेटने 49 धावा दिल्या.
[caption id="attachment_1068268" align="aligncenter" width="800"] भारतीय क्रिकेट संघात भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन झालं. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात खेळत आहे. त्याने 1430 ...
भुवनेश्वर कुमारने रचला विक्रम
भुवनेश्वर कुमारने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम रचला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकले आहेत. भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 680 चेंडू निर्धाव टाकले आहेत.





