इतकी वर्षे जपलं ते गमावलं..! टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या टी20 कारकिर्दीला डाग

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी20 सामना सुरू आहे. या सामन्याच्या माध्यमातून चार वर्षांनी भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. पहिल्या दोन चेंडूत विक्रम रचला. पण नंतर एक चूक केली आणि कारकिर्दीला डाग लावला.

क्राईस्टचर्च येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी20 सामना सुरू आहे. या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला खेळण्याची संधी मिळाली. खरं तर हा भुवनेश्वर कुमारचा कमबॅक सामना आहे. भुवनेश्वर कुमारने चार वर्षांनी भारतीय संघात कमबॅक केलं आहे. तसेच पहिले चेंडू निर्धाव टाकत विक्रम रचला. पहिल्या षटकात दोन निर्धाव चेंडू टाकत 4 धावा दिल्या. पण त्यानंतरच्या षटकात एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला. दुसऱ्या षटकात त्याने कधीही न केलेली एक चूक केली. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एक छोटा डाग लागला आहे. भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो बॉल टाकला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भुवनेश्वर कुमारचा पहिलाच नो बॉल होता. भुवनेश्वर कुमारने 299.3 चेंडूंनंतर पहिल्यांदाच नो बॉल टाकला. यासह विश्वविक्रम रचण्याची मोठी संधी त्याच्या हातून हुकली.



टी20 नो बॉल न टाकता सर्वाधिक षटकं टाकणारे गोलंदाज


भुवनेश्वर कुमारकडे इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदचा विश्वविक्रम तोडण्याची संधी होती. आदिल रशीदने 320.2 षटकानंतर नो बॉल टाकला होता. भुवनेश्वर कुमारला हा विक्रम मोडण्याची संधी होती. पण 299.3 चेंडूनंतर नो बॉल पडला आणि विक्रम हुकला. पण वेगवान गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार नंबर 1 गोलंदाज आहे. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारला नो बॉल टाकल्याचा फटका बसला. कारण पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाला आणि साइफर्टने चौकार मारला. या षटकात भुवनेश्वर कुमारने एकूण 17 धावा दिल्या.


भुवनेश्वर कुमारसाठी कमबॅकचा पहिलाच सामना महागात पडला. कारण त्याने चार षटकं टाकली आणि एकही विकेट मिळाला नाही. उलट सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 12.25 च्या इकोनॉमी रेटने 49 धावा दिल्या.



भुवनेश्वर कुमारने रचला विक्रम


भुवनेश्वर कुमारने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम रचला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकले आहेत. भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 680 चेंडू निर्धाव टाकले आहेत.

Comments
Add Comment

French Open 2026: फ्रेंच ओपनमध्ये मोठा उलटफेर! सिंधूचा थरारक विजय तर तरुण खेळाडूने श्रीकांतला चारली धूळ

पॅरिस (फ्रान्स) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या रोमांचक फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या स्टार खेळाडूंनी

भुवनेश्वर कुमारने पहिल्या दोन चेंडूत रचला विश्वविक्रम, 1430 दिवसानंतर केली कामगिरी

[caption id="attachment_1068268" align="aligncenter" width="800"] भारतीय क्रिकेट संघात भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन झालं. चार वर्षांच्या प्रदीर्घ

Asian Para Games 2026: सुवर्णा राजने थाळीफेकमध्ये पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक, इतर खेळाडूंचीही चमकदार कामगिरी

जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी

IND vs NZ 1st T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार अय्यर प्रथम गोलंदाजी निवडली आणि म्हणाला..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना क्रिस्टचर्च येथे होत

Asian Para Games : भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती....

नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सदरम्यान भारतीय पथकाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे.

IND vs NZ 1st T20 Live Streaming : भारत न्यूझीलंड टी20 मालिका कुठे पाहता येणार? A to Z डिटेल्स जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबरपासून होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज