Thursday, October 22, 2026

IND vs NZ T20: संजू सॅमसनचा न्यूझीलंडमध्ये झंझावात, अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं; पण चौथ्यांदा...

भारत आणि न्यूझीलंड पहिल्या टी20 सामन्यात सलामीवीर संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली. संजू सॅमसनने यासह एका कॅलेंडर वर्षात नववं अर्धशतक ठोकलं आहे. चला जाणून घेऊयात त्याच्या या खेळीबाबत..

1/5 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 225 धावा केल्या आणि विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने झंझावाती खेळी केली.(Photo: ANI) 2/5 संजू सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना आक्रमक बाणा दाखवला. संजू सॅमसने 23 चेंडूत 50 धावा केल्या. यावेळी त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले.त्याचा स्ट्राईक रेट 217.3 चा होता. (Photo: ANI) 3/5 संजू सॅमसनची एका वर्षातील आठवी अर्धशतकी खेळी आहे. यासह त्याने इशान किशनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. इशानने या वर्षात 8 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. तर या यादीत 11 अर्धशतकांसह सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर, 9 अर्धशतकांसह विराट कोहली आणि अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: ANI) 4/5 संजू सॅमसनचा जम बसला होता. त्याने 32 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावांची खेळी केली होती. पण 33व्या चेंडूचा सामना करताना विकेट पडली. मिचेल सँटनरने त्याला क्लिन बोल्ड केलं. (Photo: ANI) 5/5 सँटनरने टी20 क्रिकेटमध्ये संजू सॅमसनला चौथ्यांदा बाद केलं. संजू सॅमसनने सँटनरच्या 36 चेंडूंचा सामना केला आहे. त्यात 27 धावा केल्या आणि 4 वेळा विकेट दिली. या 36 चेंडूत 17 चेंडू निर्धाव घालवले आहेत. (Photo: ANI)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >