IND vs NZ T20: संजू सॅमसनचा न्यूझीलंडमध्ये झंझावात, अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं; पण चौथ्यांदा...

भारत आणि न्यूझीलंड पहिल्या टी20 सामन्यात सलामीवीर संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली. संजू सॅमसनने यासह एका कॅलेंडर वर्षात नववं अर्धशतक ठोकलं आहे. चला जाणून घेऊयात त्याच्या या खेळीबाबत..

1/5 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 225 धावा केल्या आणि विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने झंझावाती खेळी केली.(Photo: ANI)

2/5 संजू सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना आक्रमक बाणा दाखवला. संजू सॅमसने 23 चेंडूत 50 धावा केल्या. यावेळी त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले.त्याचा स्ट्राईक रेट 217.3 चा होता. (Photo: ANI)

3/5 संजू सॅमसनची एका वर्षातील आठवी अर्धशतकी खेळी आहे. यासह त्याने इशान किशनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. इशानने या वर्षात 8 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. तर या यादीत 11 अर्धशतकांसह सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर, 9 अर्धशतकांसह विराट कोहली आणि अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: ANI)

4/5 संजू सॅमसनचा जम बसला होता. त्याने 32 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावांची खेळी केली होती. पण 33व्या चेंडूचा सामना करताना विकेट पडली. मिचेल सँटनरने त्याला क्लिन बोल्ड केलं. (Photo: ANI)

5/5 सँटनरने टी20 क्रिकेटमध्ये संजू सॅमसनला चौथ्यांदा बाद केलं. संजू सॅमसनने सँटनरच्या 36 चेंडूंचा सामना केला आहे. त्यात 27 धावा केल्या आणि 4 वेळा विकेट दिली. या 36 चेंडूत 17 चेंडू निर्धाव घालवले आहेत. (Photo: ANI)
Comments
Add Comment

हरभजन सिंगचा खळबळजनक गौप्यस्फोट; 'तो' भारतीय क्रिकेटचा सर्वात काळा काळ, ग्रेग चॅपेलने...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने ग्रेग चॅपेल यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या

IND vs NZ 1st T20: नितीश कुमार रेड्डीचा मोठा गोंधळ! फ्री-हिटवर झेल टिपून साजरा केला जल्लोष, नंतर जी चूक लक्षात आली...

क्राइस्टचर्च (न्यूझीलंड) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात एक अतिशय रंजक आणि हसण्यावारी

इतकी वर्षे जपलं ते गमावलं..! टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या टी20 कारकिर्दीला डाग

क्राईस्टचर्च येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी20 सामना सुरू आहे. या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये वेगवान

French Open 2026: फ्रेंच ओपनमध्ये मोठा उलटफेर! सिंधूचा थरारक विजय तर तरुण खेळाडूने श्रीकांतला चारली धूळ

पॅरिस (फ्रान्स) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या रोमांचक फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या स्टार खेळाडूंनी

भुवनेश्वर कुमारने पहिल्या दोन चेंडूत रचला विश्वविक्रम, 1430 दिवसानंतर केली कामगिरी

[caption id="attachment_1068268" align="aligncenter" width="800"] भारतीय क्रिकेट संघात भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन झालं. चार वर्षांच्या प्रदीर्घ

Asian Para Games 2026: सुवर्णा राजने थाळीफेकमध्ये पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक, इतर खेळाडूंचीही चमकदार कामगिरी

जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी