क्राइस्टचर्च (न्यूझीलंड) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात एक अतिशय रंजक आणि हसण्यावारी नेण्यासारखा प्रसंग घडला. भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने न्यूझीलंडच्या फलंदाजाचा झेल टिपत जोरदार सेलिब्रेशन केले, पण काही क्षणानंतर त्याला समजले की हा चेंडू 'फ्री-हिट' होता. त्याची हीच भन्नाट रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून, या सामन्यात भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Bhuvneshwar Kumar 3rd over and getting hit hard
Embarassment movement for the Nitish Kumar Reddy https://t.co/Fha6ZqKlj1
— BackToLobby (@_backtolobby) October 22, 2026
फ्री-हिटवर झेल घेतला अन् सुरू झाला जल्लोष
सामन्यादरम्यान भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत असताना न्यूझीलंडचा फलंदाज बेवन जेकब्सने फुल लेंथ चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा शॉट नीट कनेक्ट झाला नाही आणि चेंडू थेट लाँग-ऑनच्या दिशेने उडाला. तिथे उभ्या असलेल्या नितीश कुमार रेड्डीने अत्यंत चपळाईने हा झेल टिपला. फलंदाज बाद झाल्याच्या आनंदात रेड्डीने सुरुवातीला जोरदार सेलिब्रेशनही केले.
[caption id="attachment_1068268" align="aligncenter" width="800"] भारतीय क्रिकेट संघात भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन झालं. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात खेळत आहे. त्याने 1430 ...
अन् मग लक्षात आली स्वतःची चूक
मात्र, आनंद साजरा केल्यानंतर काही वेळातच रेड्डीला आठवले की हा चेंडू 'फ्री-हिट' होता. नियमानुसार फ्री-हिटवर फलंदाज रन-आऊटशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने बाद होऊ शकत नाही. आपली ही मोठी चूक लक्षात आल्यानंतर रेड्डीला स्वतःवरच हसू आले आणि त्याने तातडीने हात जोडून माफी मागितली. मैदानावर घडलेल्या या गमतीशीर प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
MOYE MOYE MOMENT! 😂😭
After a 4-year wait, Bhuvneshwar Kumar finally bowls in international cricket!
Despite bowling brilliantly, wickets just weren't coming his way. Then came the moment when he bowled the 2nd no-ball of his career!
The batter smashed the free-hit delivery straight into Nitish Reddy's hands. Nitish celebrated the catch, and Bhuvi was delighted too… UNTIL THEY REALISED IT WAS A FREE HIT! 😂
NITISH REDDY LOOKED VERY SAD 😭
— Mukku (@Cric_Mukku) October 22, 2026
क्षेत्ररक्षणाचा प्रश्न आणि न्यूझीलंडची धावसंख्या
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण चिंतेचा विषय ठरले आहे. या सामन्यातही त्याचे दर्शन घडले. यापूर्वी अभिषेक शर्माने डॅरिल मिचेलचा एक अत्यंत सोपा झेल सोडला होता, ज्याचा फायदा घेत मिचेलने महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. या सामन्यात ग्लेन फिलिप्सच्या तुफान नाबाद 82 धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत 225 धावांचा डोंगर उभा केला, ज्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे.