मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत प्लेक्समुक्त करण्याची घोषणा महापौरांनी केल्यानंतर त्यांनी स्वत: च्या प्रभागातून या जाहिरात फलक काढण्यास सुरुवात केली. याच मुद्दयावरून मुंबईतील वाढत्या बॅनरवरून महापाालिका स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा रंगली आणि कोणत्याही परिस्थितीत गुरुवार सकाळपर्यंत मुंबईतील सर्व बॅनर हटवण्याची मोहिम त्वरीत हाती घेण्यात यावी अशी एकमुखी मागणी स्थायी समितीने केली.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मुंबईत बई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनातून २४ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या काळात 'उत्सव लोकशाहीचा, गर्व मुंबईचा' हे नागरी संदेश महापालिका हद्दीतील जाहिरात फलकांवर प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी फ्लेक्स छपाई, फलकांवर चढविणे व उतरविणे ही कामे अल्प मुदतीत पूर्ण निविदा मागवून पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी १२.७८ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता यशोधर फणसे यांनी प्लेक्स आपण लावले का? तसेच डिजिटल बोर्डवर अशाप्रकारच्या सूचना सक्तीच्या कराव्यात तसेच महापौरांच्या आवाहनानुसार विचार केला जावा अशी सूचना केली. यावर शिवसेनेचे अमेय घोले यांनी जाहिरातींच्या धोरणाबाबत प्रश्न उपस्थितीत करून याचा फेरविचार करावा अशी सूचना केली. तर सईदा खान यांनी रस्ता दुभाजकांवरही बॅनर लावले जात असल्याबाबत चिंता व्यक्त केली. तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी मुंबईत अधिकृत फ्लेक्स बोर्ड किती आहेत असा सवाल करत यामध्ये एक मोठे रॅकेट काम करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे अनधिकृतवर किती कारवाई केली आणि किती हटवले याची माहिती मागवली. तर जमीर कुरेशी यांनी घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील जी जाहिरात कंपनी होती त्याच्याशी संलग असलेल्या कंपनीनला महापालिकेने निवडणूक काळातील जाहिरातींचे काम दिले होते असा आरोप केला. तर तेजिंदर तिवाना यांनी निवडणूक होवून दहा महिने उलटत आल्यानंतर हा प्रस्ताव आल्याचे सांगत हा प्रस्ताव यापूर्वीच का आला नाही असा सवाल केला. त्यामुळे कुठेतरी पैसे दिल्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीची गरज असल्याने हा प्रस्ताव आता मंजुरीला आल्याचे सांगितले.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील वाढत्या प्रदुषणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा तीव्र चिंता व्यक्त केली जात असतानाच आता अंधेरी आणि माहिममध्ये ...
तर यशवंत किल्लेदार यांनी यापूर्वी जर सर्वच पक्षांनी न्यायालयात आम्ही बॅनर, फलक लावणार नाही असे प्रतिज्ञापत्रक दिले होते अशी आठवण करून देत एखाद्या पक्षाने आधी सुरवात केली म्हणून मग आता सर्वच लावतात. त्यामुळे मुंबई फ्लेक्समुक्त व्हायलाच हवी असे सांगितले. तर गणेश खणकर यांनी महापौरांनी आवाहन केलेले आहे. पण अजुनही बॅनर आणि फलक दिसून येत आहे. त्यामुळे जे उर्वरीत फलक आहेत ते त्वरीत काढण्यात यावे आणि गुरुवार सकाळपर्यंत मुंबई फ्लेक्समुक्त होईल अशाप्रकारची माहिती तातडीने राबवावी अशी सूचना केली. त्यानंतर या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.