बिग बॉस सीजन २० च्या मंचावर शोचा होस्ट सलमान खानने एक मोठी घोषणा केली आहे. या विकेंडला शोचा होस्ट बदलणार असल्याचं सलमान खानने सांगितलं. या विकेंडला स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी अभिनेता आणि निर्माता रोहित शेट्टी शोमध्ये येणार आहे. सलमानला आपल्या पूर्वनियोजित व्यावसायिक कामामुळे काही दिवस शोपासून लांब राहावे लागणार आहे. दरम्यान, त्याने स्वतः रोहितला विकेंड एपिसोडची जबाबदारी घेण्यास सांगितले आहे.
सलमान खानने याबद्दल स्पर्धकांना पूर्वकल्पना दिली होती. सलमानने घरातील सदस्यांना सांगितले की, 'मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला भेटणार नाही. एका पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी इथे उपस्थित राहणार नाही. त्यामुळे मी रोहित शेट्टीला इथे येऊन पुढच्या 'विकेंड का वॉर' चे होस्टिंग करण्याची विनंती केली.' यासोबतच रोहितच्या बिग बॉसमधील या एन्ट्रीबद्दल बोलताना सलमानने घरातील सदस्यांना इशारा देखील दिला की, 'जर तुम्हाला धोक्याशी खेळायला आवडत असेल तर तुम्हाला जे करायचं आहे ते खुशाल करा. मी पुढच्या आठवड्यानंतर भेटेन.'
Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, दसऱ्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या ...
दरम्यान, अभिनेता आणि निर्माता रोहित शेट्टी याला बिग बॉसचे घर काही नवीन नाही. यापूर्वीदेखील सलमान खानच्या अनुपस्थितीत रोहितने विकेंड का वॉरचे होस्टिंग केले आहे. तो गेल्या वर्षी बिग बॉस १९ मध्ये देखील दिसला होता. यावेळी त्याने स्पर्धक गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट यांच्याशी संवाद साधला होता. रोहित शेट्टी कलर्स टीव्हीवरील 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाचं होस्टिंग देखील करतो. बिग बॉसमध्ये त्याच्या पुनरागमनामुळे आता तो स्पर्धकांची कशी शाळा घेतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.