सुनेत्रा पवार भाकरी फिरवणार? मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; कामगिरी सरस नसलेल्या मंत्र्यांना डच्चू, युवा चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असून सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य भूमिकेकडे लक्ष लागले आहे. कामगिरी समाधानकारक नसलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची आणि युवा चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र, या संभाव्य बदलांबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्वात बदल करण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या गोटातून मिळत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीमुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. मंत्र्यांच्या कार्यशैलीबाबतची नाराजी, मंत्रिपदाचा उपयोग पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी होत नसल्याचा निष्कर्ष आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचे समजते. राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या वाट्याला अर्थखाते मिळावे, तसेच पक्षाच्या कोट्यातील मंत्रिपदांमध्ये बदल करावेत, अशी मागणी पक्षाच्या नेतृत्वाकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधीही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीमुळे राष्ट्रवादीतील संभाव्य बदलांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



राष्ट्रवादीतील काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून पक्षाचा जनाधार वाढविणे, संघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे अपेक्षित असताना, त्या दिशेने पुरेसे काम होत नसल्याचा निष्कर्ष नेतृत्वाने काढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मंत्रिमंडळातील काही विद्यमान चेहऱ्यांना वगळून युवा नेत्यांना संधी देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची चर्चा आहे.


मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांबरोबरच अर्थखात्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखाते मिळाल्यास राज्य सरकारमधील खातेवाटपात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात संघटनात्मक फेररचना आणि मंत्रिमंडळातील बदल याबाबत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : जरांगेंनी समाजाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर करू नये; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

"खरी व्होटचोरी 2019 मध्ये झाली...", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई: "महाराष्ट्रातील जनतेने २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला मतदान करून जनादेश दिला होता. मात्र, सत्तेच्या

मनोज जरांगेंच्या संपत्तीची चौकशी करा! रामदास कदमांची मागणी

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी नारायणगड येथील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"जळजळ, मळमळ... कोणी पुढे गेला की... " उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर बोचरी टीका

मुंबई: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

"जिंकता तेव्हा EVM चांगली आणि हरता तेव्हा...", उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका

मुंबई: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. SIR च्या

Priyanka Chaturvedi: नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा संजय राऊतांना घरचा आहेर, नेमक्या काय म्हणाल्या?

मुंबई: अल्बानियातील हिंसक आंदोलनाच्या संदर्भात उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर माजी खासदार