Asian Para Games 2026: सुवर्णा राजने थाळीफेकमध्ये पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक, इतर खेळाडूंचीही चमकदार कामगिरी

नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताच्या सुवर्णा राजने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच पॅरा बॅडमिंटनमध्ये दोन कांस्य आणि तिरंदाजीत स्वाती चौधरीने रौप्यपदक जिंकत भारताची पदकसंख्या वाढवली आहे.

जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. भारताच्या स्टार पॅरा ॲथलीट सुवर्णा राजने महिलांच्या थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकत भारतासाठी सुवर्णखाते उघडले. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसह पॅरा बॅडमिंटन आणि तिरंदाजीतही भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे.



सुवर्णा राजची सुवर्णझेप, 15.66 मीटर फेकत रचला इतिहास


महिलांच्या थाळीफेक एफ-५४ प्रकारात उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील सुवर्णा राजने आपल्या चमकदार खेळाचे प्रदर्शन केले. सहा खेळाडूंमध्ये झालेल्या या अटीतटीच्या स्पर्धेत सुवर्णाने तिच्या सहापैकी चार प्रयत्नांत 15 मीटरहून अधिक लांब थ्रो केला. तिने पाचव्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करत 15.66 मीटर अंतर पार केले आणि अव्वल स्थान पटकावले. या प्रकारात इराणच्या शाहला हदीदीने रौप्य तर व्हिएतनामच्या न्गुयेन थी न्गोक थुईने कांस्य पदक जिंकले.



पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला दोन कांस्यपदके


पॅरा बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताला दोन कांस्यपदके मिळाली. SL-3-SU-5 प्रकारात मनीषा रामदास आणि प्रमोद भगत यांच्या जोडीने उत्कृष्ट खेळ केला, मात्र उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या जोडीकडून त्यांना 21-16, 13-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. तसेच, SH-6 प्रकारात कृष्णा नागर आणि नित्या श्री यांच्या जोडीलाही इंडोनेशियाच्या खेळाडूंविरुद्ध 14-21, 18-21 ने पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे दोन्ही जोड्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.



स्वाती चौधरीने तिरंदाजीत जिंकले रौप्यपदक


तिरंदाजीच्या महिलांच्या W-1 वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या स्वाती चौधरीने चमकदार कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावावर केले. अंतिम फेरीत चीनच्या मेंगकान सेनविरुद्ध स्वातीने सुरुवातीला 4-2 अशी आघाडी घेतली होती, परंतु चुरशीच्या सामन्यात चिनी तिरंदाजाने पुनरागमन करत स्वातीचा 6-4 ने पराभव केला आणि स्वातीला रौप्यपदकावर संतोष मानवा लागला.

Comments
Add Comment

French Open 2026: फ्रेंच ओपनमध्ये मोठा उलटफेर! सिंधूचा थरारक विजय तर तरुण खेळाडूने श्रीकांतला चारली धूळ

पॅरिस (फ्रान्स) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या रोमांचक फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या स्टार खेळाडूंनी

भुवनेश्वर कुमारने पहिल्या दोन चेंडूत रचला विश्वविक्रम, 1430 दिवसानंतर केली कामगिरी

[caption id="attachment_1068268" align="aligncenter" width="800"] भारतीय क्रिकेट संघात भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन झालं. चार वर्षांच्या प्रदीर्घ

IND vs NZ 1st T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार अय्यर प्रथम गोलंदाजी निवडली आणि म्हणाला..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना क्रिस्टचर्च येथे होत

Asian Para Games : भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती....

नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सदरम्यान भारतीय पथकाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे.

IND vs NZ 1st T20 Live Streaming : भारत न्यूझीलंड टी20 मालिका कुठे पाहता येणार? A to Z डिटेल्स जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबरपासून होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत रोहित-विराट खेळणार की नाही? बीसीसीआय अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया समोर

[caption id="attachment_1068135" align="aligncenter" width="800"] विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना वारंवार एक धाकधूक लागली आहे. वनडे