Friday, October 23, 2026

Video: फिल्डर झेल पकडत होता, पण टेम्बा बावुमा पाठमोरा उभा राहिला; असं का ते त्यानेच शेवटी सांगितलं...

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना नुकताच पार पाडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 31 धावांनी पराभूत केलं. तसेच मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. पण या सामन्यातील एक व्हिडीओची चर्चा होत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. दुसऱ्या सामन्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो टेम्बा बावुमा.. त्याच्या दीड शतकी खेळीमुळे दक्षिण अफ्रिकेचा विजयाचा मार्ग सुकर झाला. पण या सामन्यात एक वेळ अशी आली की, क्रीडाप्रेमींना हसण्याशिवाय पर्याय उरला नाही. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हा प्रकार घडला. स्टीव्ह स्मिथ उंच मारलेल्या फटक्यानंतर टेम्बा बावुमा पाठमोरा उभा राहिला होता. स्टीव्ह स्मिथने पुल शॉट मारला आणि चेंडू वर चढला. स्क्वेअर लेगला असलेल्या ब्रीत्झ्केने झेल पकडण्यासाठी धाव घेतली. सर्व खेळाडूंच्या नजरा या झेलकडे होत्या. कारण स्टीव्ह स्मिथची विकेट किती महत्त्वाची आहे, हे माहिती होतं. पण टेम्बा बावुमा मात्र त्या झेलकडे पाठ दाखवून उभा होता. त्याने असं करण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्याचं उत्तर आता बावुमाने दिलं आहे.

टेम्बा बावुमा काय म्हणाला?

दक्षिण अफ्रिकेच्या विजयानंतर रिपोर्टरने या व्हिडीओवरून थेट टेम्बा बावुमाला प्रश्न विचारला, तेव्हा त्याने त्या क्षणी नर्व्हस असल्याचं सांगितलं. त्यामुळेच फिल्डरकडे पाहिलं नाही. बावुमा म्हणाला की, 'सेंट जॉर्ज पार्कमध्ये उंच झेल पकडणं खूप कठीण असतं. कारण खूप हवा असते. मी पाहिलंच नाही की झेल पकडण्यासाठी खाली कोण उभं आहे. त्याच्यावर विश्वास नव्हता हा काही प्रश्नच नव्हता. पण झेल स्टीव्ह स्मिथचा होता आणि सामन्यातील टर्निंग पॉइंट होता. तेव्हाच स्टेडियमवर ढग आले होते. त्यामुळे मी तसं करून माझ्या भावना आवरण्याचा प्रयत्न केला.'

टेम्बा बावुमा जेतेपदाचा हिरो

दुसऱ्या कसोटी सामन्यात खरं तर दक्षिण अफ्रिकेची स्थिती नाजूक होती. 110 धावांवर 6 गडी तंबूत होते. त्यानंतर टेम्बा बावुमाने 179 धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेला 425 धावांपर्यंत पोहोचवलं. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. मार्को यानसेनने 85 आणि सायमन हार्मरने 82 धावांची खेळी केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 99 धावांवर बाद झाला. तर फॉलोऑन मिळाल्यानंतर पुन्हा फलंदाजी आली. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 295 धावा करू शकला. त्यामुळे हा सामना दक्षिण अफ्रिकेने एक डाव आणि 31 धावांनी जिंकला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >