Friday, October 23, 2026

IND vs NZ Live Streaming: भारत न्यूझीलंड दुसरा टी20 कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ दुसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने बाजी मारली होती आणि 1-0 ने आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या सामन्यात काय होतं? याकडे लक्ष लागून आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने खिशात घातला होता. आता दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर भारतीय संघ 2-0 ने आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने 225 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. पण भारतीय संघाने 6 गडी गमवून 19.4 षटकात हे आव्हान पूर्ण केलं. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या सामन्यातील प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज इशान किशन या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशीने भारतासाठी शेवटचा सामना एशियन गेम्स स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर आता मैदानात उतरण्याची शक्यता वाढली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी20 सामना केव्हा आणि कुठे होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी20 सामना शनिवारी (24 ऑक्टोबर) क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी20 सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होणार आहे. सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटाआधी नाणेफेक केली जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी20 सामना भारतातील कोणत्या टीव्ही चॅनल्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल?

सोनी स्पोर्ट्स टीव्ही चॅनल्स, सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3, शनिवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण करतील.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी20 सामना ऑनलाइन कसा पाहावा?

सोनी लिव्हच्या ॲप आणि वेबसाइटवर शनिवारी दुसऱ्या भारत-न्यूझीलंड टी20 सामन्याचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण केले जाईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारताचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, वरुण चकर, प्रिन्स यादव. न्यूझीलंडचा संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, काईल जेमिसन, जेकब डफी.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >