Friday, October 23, 2026

IND W vs ZIM W: जिंतीमनी कालिटा भारताची खेळाडू क्रमांक 159, पहिल्याच सामन्यात अशी होती कामगिरी

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतून जिंतीमनी कालिटा हीने भारतीय संघात पदार्पण केलं आहे. पहिलाच सामना तिच्यासाठी कसा ठरला? ते जाणून घेऊयात..

1/5 भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला वनडे सामना होत आहे. हा सामना वडोदरात होत आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू जिंतीमनी कालिटा हीने पदार्पण केलं. कालिटा भारतीय वनडे संघात पदार्पण करणारी 159वी खेळाडू ठरली. (Photo: BCCI Women) 2/5 आसामची क्रिकेटपटू जिंतीमनी कालिटा हिला हरमनप्रीत कौरने कॅप देऊन संघात स्वागत केलं. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यापासून जिंतीमनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवास सुरू झाला आहे. तिचा क्रिकेट कारकिर्दीतील पहिलाचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. (Photo: BCCI Women) 3/5 जिंतीमनी कालिटा हिला रेणुका सिंह ठाकुरच्या जागी संधी मिळाली आहे. वनडे संघात येताच तिला पदार्पणाची संधी मिळाली आहे. जिंतीमनी या वर्षी भारताच्या वनडे संघात पदार्पण करणारी तिसरी क्रिकेटपटू ठरली आहे. (Photo: BCCI Women) 4/5 जिंतीमनी कालिटाच्या आधी उमा छेत्री आणि वैष्णवी शर्मा यांनी भारतीय संघात या वर्षी पदार्पण केलं आहे. 22 वर्षीय जिंतीमनीकडे फक्त 13 वुमन्स प्रीमियर लीग सामने खेळण्याचा अनुभव आहे. (Photo: BCCI Women) 5/5 झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात जिंतीमनी कालिटाची गोलंदाजीत छाप पडली नाही. तिने पाच षटकं टाकत 23 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळाली नाही. दुसरीकडे, तिला फलंदाजीची संधी मिळाली नाही. (Photo: BCCI Women)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >