INDW vs ZIMW: भारतीय महिला संघाने पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेला नमवलं, असा झाला सामना

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली. भारताने 9 गडी राखून झिम्बाब्वेला मात दिली. यासह वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारताने झिम्बाब्वेला टी20 मालिकेत 3-0 ने मात दिली होती. त्यानंतर वनडे मालिकेला सुरूवात झाली असून पहिल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली आहे. स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर टी20 मालिकेनंतर पहिल्याच वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारतासारख्या बलाढ्य संघासमोर मोठी धावसंख्या करणं काही झिम्बाब्वेला जमलं नाही. झिम्बाब्वेने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 197 धावा केल्या आणि विजायासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने सहज गाठलं. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी आश्वासक सुरूवात करून दिली. त्यांच्या सकारात्मक सुरूवातीमुळे भारताचा विजयी पक्का होत गेला. स्मृती मंधाना 32 धावा करून बाद झाली. त्यानंतर प्रतिका रावल आणि शफाली वर्मा यांनी मोर्चा सांभाळला आणि विजयी सलामी दिली. प्रतिका रावलने शतक ठोकत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. तर शफाली वर्माने 33 चेंडूत 64 धावांची खेळी केली.



झिम्बाब्वेचा डाव


झिम्बाब्वेकडून प्रिय बिझा हीने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही बॅटर 30 धावांचा पल्ला गाठू शकला नाही. मॉडे्टर मुपाचिकवा हीने 25, चिपो मुगेरी तिरिपानो 21, मिशेल मावुंगा हीने 29 धावा केल्या. तर न्याशआ ग्वांझुरा 13, चिएद्झा धुरूरू 10, टेंडाई माकुशा 10, लॉरीन फिरी 1, शार्न मेयर्स 8 आणि नोमवेलो सिबांडा 2 धावा करून बाद झाले. भारताकडून श्री चरणी भेदक मारा करत 4 विकेट काढल्या. तर क्रांती गौडच्या खात्यात 3 विकेट आल्या. दीप्ती शर्माने 2, तर शफाली वर्माने 1 विकेट काढली.



दोन्ही संघांची प्लेइंग 11


भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), श्री चरणी, क्रांती गौड, सायली सातघरे, जिंतीमणी कलिटा.


झिम्बाब्वे महिला (प्लेइंग इलेव्हन): प्रिय बिझा, शार्ने मेयर्स, न्याशा ग्वांझुरा, मॉडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), चिएड्झा धुरुरु, चिपो मुगेरी-तिरिपानो, मिशेल मावुंगा, नोमवेलो सिबांडा (कर्णधार), तेंडाई माकुशा, लॉरिन फिरी, ओलिंदर चारे.

Comments
Add Comment

4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4! झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात प्रतिका रावलचं झंझावाती शतक

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने खिशात घातली

IND W vs ZIM W: जिंतीमनी कालिटा भारताची खेळाडू क्रमांक 159, पहिल्याच सामन्यात अशी होती कामगिरी

[caption id="attachment_1068670" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला वनडे सामना होत आहे. हा सामना वडोदरात होत

IND vs NZ Live Streaming: भारत न्यूझीलंड दुसरा टी20 कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने खिशात घातला

Sabbineni Meghana : भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्तीची घोषणा, क्रीडा जगतात खळबळ

नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघातील धडाकेबाज सलामीची फलंदाज सब्बिनेनी मेघनाने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व

‘फिट हो, संघात परतशील!’ विराट कोहलींचं आश्वासन, पण नंतर फोनही उचलला नाही? अमित मिश्राचा मोठा दावा

भारतीय क्रिकेटमधील माजी लेगस्पिनर अमित मिश्रा याने विराट कोहली आणि तत्कालीन मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मधून ईशान किशन बाहेर, 15 वर्षांच्या युवा खेळाडूला मिळणार संधी

क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हलवर उद्या (शनिवारी) होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातून भारतीय