Saturday, October 24, 2026

Udta Teer Movie: आयुष्मान-सारा यांच्या ‘उडता तीर’ची बॉक्स ऑफिसवर एन्ट्री; पहिल्या दिवशी किती कमाई?

आयुष्यमान खुराना आणि सारा अली खान यांच्या 'उडता तीर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर माफक कमाई केली. या स्पाय कॉमेडीला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि पहिल्या दिवशी बहुतांश वेळेस तो मोठी गर्दी खेचण्यात अयशवी ठरला. 'उडता तीर' ने भारतात पहिल्या दिवशी 6265 शोजमधून 4.10 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने एकूण 13% थिएटर उपस्थिती नोंदवली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या शोजदरम्यान चित्रपटाची उपस्थिती 25% पर्यंत वाढली, जे उर्वरित विकेंडसाठी एक आश्वासक चिन्ह आहे.

दरम्यान, यामी गौतमचा 'नयी नवेल्ली' आणि राजकुमार रावचा 'प्रहार' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड सुरु ठेवत आहेत. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर आपली कामगिरी नोंदवली आहे. 'नयी नवेल्ली'ने चित्रपटगृहांमधील आठव्या दिवशी, शुक्रवारी, भारतात केवळ 60 लाख रुपयांची निव्वळ कमाई केली. आठव्या दिवशी 'प्रहार'नेही 60 लाख रुपयांची निव्वळ कमाई केली. प्रदर्शनाच्या दिवशी 'उडता तीर' ने प्रेक्षकांना या दोन्ही चित्रपटांपासून सहजपणे दूर खेचले. गुरुवारच्या तुलनेत नयी नवेल्लीच्या कमाईत 50% घेत झाली तर, प्रहारच्या कमाईत 60% घट झाली.

आयुष्मान खुरानाच्या मागील चित्रपटांशी तुलना करता, 'उडता तीर'ने त्याच्या 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पती पत्नी और वो दो'ला किंचित मागे टाकले आहे. त्या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी सुमारे 04 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली होती, तर 'उडता तीर'ने 4.10 कोटी रुपयांची निव्वळ कामे करून किंचित आघाडी घेतली आहे. या स्पाय कॉमेडीने 'चंदीगढ करे आशिकी' आणि 'डॉक्टर जी' यांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईला सहजपणे मागे टाकले. 'चंदीगढ करे आशिकी'ने भारतात 3.75 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली होती, तर 'डॉक्टर जी'ने चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी 3.87 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. तथापि, हा चित्रपट आयुष्मानच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'थम्मा' या चित्रपटाच्या खूप मागे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >