Diwali Firecracker Rules : दिवाळीत फटाके फोडताना सावधान ! नियम मोडल्यास होणार कारवाई ; विक्रीच्या परवान्याबाबतही महत्त्वाचे नियम

दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि मुंबई महापालिकेकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीसंदर्भात पोलिस प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पदपथ आणि गल्ल्यांमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच फटाक्यांच्या आवाजावर मर्यादा, संवेदनशील ठिकाणांपासूनचे अंतर आणि तात्पुरत्या विक्री परवान्यांच्या कालावधीबाबतही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करण्यापूर्वी आणि फोडण्यापूर्वी नागरिकांनी नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.



कुठे फटाके फोडण्यास बंदी ?


दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि मुंबई महापालिकेकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार फटाक्यांच्या वापरावर विविध निर्बंध लागू आहेत.


- रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे: रस्ते, पदपथ, गल्ल्या आणि रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके फोडण्यास मनाई असल्याचे नियमावलीत नमूद आहे.


- संवेदनशील ठिकाणे: रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि न्यायालयांपासून १०० मीटरच्या परिसरात फटाके फोडण्यावर निर्बंध आहेत.


- रात्रीच्या वेळेची मर्यादा: रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडण्यास बंदी आहे.


- लेझर आणि बीम लाइट्स: सण-समारंभ आणि मिरवणुकांमध्ये तीव्र प्रकाशाचे दिवे, लेझर आणि बीम लाइट्सच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.


नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडताना निर्धारित वेळ, जागा आणि ध्वनीमर्यादांचे पालन करणे गरजेचे आहे.



ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना


सण-समारंभांदरम्यान ध्वनीची पातळी निर्धारित मर्यादेत राहावी, यासाठी ध्वनी मोजणाऱ्या उपकरणांच्या वापराबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. खासगी जागांमध्ये आयोजित कार्यक्रमांनाही लागू ध्वनीमर्यादांचे पालन करावे लागणार आहे.नागरिकांनी निर्धारित वेळेत कमी प्रदूषण करणाऱ्या ग्रीन फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, ग्रीन फटाक्यांमध्येही विषारी जड धातू आढळत असल्याचा दावा आवाज फाउंडेशनने केला असून, सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.


दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याबद्दल हायकोर्टाने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. निर्बंधांची माहिती नसल्याचे काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याची न्यायालयाची नोंद न्यायलयाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर 26 ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिका, MPCB आणि पोलीस प्रमुखांना हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



तात्पुरत्या फटाके विक्रीचे परवाने कधी मिळणार ?


दिवाळीनिमित्त तात्पुरत्या फटाके विक्रीसाठी ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी परवाने दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित विक्रेत्यांना परवान्यात नमूद केलेल्या अटी आणि कालमर्यादेचे पालन करावे लागणार आहे.परवान्याची मुदत संपल्यानंतर फटाक्यांची विक्री करता येणार नाही. विक्री न झालेला शिल्लक साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे परत जमा करणे बंधनकारक असेल.याशिवाय, तात्पुरत्या फटाके विक्रीच्या स्टॉलपासून ५० मीटरच्या परिसरात आतषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. विदेशी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करण्यासही निर्बंध आहेत. त्यामुळे विक्रेत्यांनी परवाना आणि साठ्याशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.



मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवरही निर्बंध


ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी फटाक्यांच्या आवाजाबाबतही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण संरक्षण नियमांनुसार, फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आहे. 100 पेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर बंदी घातली आहे. विशिष्ट आकाराच्या ‘ॲटमबॉम्ब’वरही कायदेशीर निर्बंध लागू राहतील.

Comments
Add Comment

Pune Crime : रिल्स डिलिट केले अन्... नववीच्या विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीवर चालवला चाकू; धक्कादायक घटनेने परिसरात तणाव!

Pune News: सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि त्यातून निर्माण होणारे वाद आता शाळकरी मुलांमधील संघर्षाचे गंभीर कारण ठरत

Nitesh Rane: तलावातील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तलावांतील गाळ काढण्यासाठी विशेष

Nitesh Rane: मच्छीमार बांधवांच्या मदतीसाठी सरकार पुढे, मंत्री नितेश राणे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

अहिल्यानगर: संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळून निघत आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली असताना

Simhastha Kumbhmela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण

[caption id="attachment_1068653" align="aligncenter" width="800"] नाशिक- त्र्यंबकेश्वर मध्ये 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत

CPA International : राहुल नार्वेकर यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या कार्यकारी समितीवर निवड

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आंतरराष्ट्रीय संस्थेच्या

Solapur Accident News: तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, 6 जण जखमी

Solapur News: तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण