Saturday, October 24, 2026

IND vs NZ, 2nd T20 : 1432 दिवसानंतर भुवनेश्वर कुमारचं नशिब चमकलं, 12 चेंडूवर मनासारखं घडलं

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या मनासारखं घडलं. पहिल्या सामन्यात फेल गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र विकेट काढली.

1/5 वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार वर्षानंतर भारतीय संघात पदार्पण केलं. पण पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात म्हणजेच 1432 दिवसानंतर त्याने विकेट काढत प्रतीक्षा संपवली. (Photo: BCCI Photo) 2/5 वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याला संघात संधी मिळाली. पण हा सामना पावसामुळे पूर्ण झालाच नाही. त्यामुळे गोलंदाजीची संधीच मिळाली नाही. (Photo: ANI) 3/5 न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिकेत भुवनेश्वर कुमारची निवड झाली. पण पहिल्या सामन्यात हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे दुसऱ्या साामन्यात काय करतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. (Photo: ANI) 4/5 दुसऱ्या टी20 सामन्यातील पहिल्या षटकात 8 धावा दिल्या. पण विकेट मिळाली नाही. पण दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट काढली. डॅरिल मिचेलला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. (Photo: ANI) 5/5 भुवनेश्वर कुमारला 1432 दिवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट मिळाली आहे. त्याने शेवटची विकेट 22 नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये घेतली होती. (Photo: ANI)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >