Jalgaon : पाळधीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर भीषण दुर्घटना ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू

पाळधी गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कामादरम्यान साईड गर्डरचा मोठा तुकडा क्रेनच्या मदतीने उचलला जात होता. त्याचवेळी क्रेन अचानक खाली कोसळली.

Jalgaon : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावरील पाळधी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली. साईड गर्डरचा मोठा भाग उचलण्याचे काम सुरू असताना सुमारे १०० फूट उंचीवरून क्रेन खाली कोसळली. या दुर्घटनेत क्रेन चालकाचा मृत्यू झाला असून, उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महामार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



क्रेन चालकाचा दुर्दैवी मृत्यू


या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव मधुकर धनराज पाटील (वय ४४, रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) असे आहे. पाळधी गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कामादरम्यान साईड गर्डरचा मोठा तुकडा क्रेनच्या मदतीने उचलला जात होता. त्याचवेळी क्रेन अचानक खाली कोसळली. उंचीवरून क्रेन कोसळल्याने दुर्घटनेची तीव्रता मोठी होती. या घटनेत चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.



उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह


पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामाचा दर्जा आणि संबंधित कामातील संभाव्य त्रुटींविषयी यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता दुरुस्तीचे काम सुरू असतानाच क्रेन कोसळल्याने कामाच्या नियोजनाबरोबरच सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही प्रश्न निर्माण झाले आहेत. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची गरज का भासली, कामादरम्यान आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का आणि क्रेन कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड होता का, या सखोल चौकशीची गरज व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Diwali Firecracker Rules : दिवाळीत फटाके फोडताना सावधान ! नियम मोडल्यास होणार कारवाई ; विक्रीच्या परवान्याबाबतही महत्त्वाचे नियम

मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीसंदर्भात पोलिस प्रशासनाकडून नियमावली जाहीर

Mumbai ATS : मुंबईत ATS ची मोठी कारवाई; जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून माहिममधून तरुणाला अटक

Mumbai News: मुंबईतील माहिम परिसरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) कारवाई करत 33 वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक

Harshvardhan Rane : हर्षवर्धन राणेचा दमदार लूक चर्चेत ! ‘सिला’ चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज

Harshvardhan Rane : ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता हर्षवर्धन राणे

Kieron Pollard : किरॉन पोलार्डवर मुंबई इंडियन्सने सोपवली मोठी जबाबदारी; बनला टीमचा नवा हेड कोच!

Sports News: आयपीएलमधील लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्स आणि वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड

Dadar : दादर मधील फुल मंडई आणि सेनापती बापट मार्ग मार्गावरील 12 अनधिकृत बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिकेकडून ‘पादचारी

ITBP स्थापना दिन : पंतप्रधान मोदींकडून ‘हिमवीरांना’ सलाम ! भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या शौर्याचे केले कौतुक

नवी दिल्ली : भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (ITBP) ६५ व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी,