मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीला महसूल गुप्तवार्ता संचालनालय (DRI- Directorate of Revenue Intelligence) ने अटक केली आहे. DRI ने केलेल्या कारवाईमध्ये 24 कॅरेटच्या परदेशी बनावटीचे सोन्याचे बिस्किटच जप्त केले आहेत. शुक्रवारी एका बांग्लादेशी नागरिकासह आणखी तिघांना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने अटक केलेली आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 2.29 किलो इतके सोनेही जप्त केले आहे. या सोन्याची सध्याच्या बाजारभाव किंमतीनुसार, 3 कोटींच्या आसपासची किंमत आहे.
बांगलादेशी नागरिक मोहम्मद जिनाथ होसेन, मुंबईतील सांताक्रूझमध्ये राहणारा व्हीजे केवट, जबलपुरमध्ये राहणारा एससी डोंगरे आणि उल्हासनगरमध्ये राहणारा एसटी माखिजा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत खळबजनक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu tawde)यांच्या कार्यालयाला आणि शहरातील ...
डीआरआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशिष्ट गुप्त माहितीनुसार दुबईहून मुंबई प्रवास करणारा मोहम्मद जिनाथ होसेन नावाचा ट्रान्झिट प्रवासी तस्करीचे सोने घेऊन जाणार होता आणि ते आंतरराष्ट्रीय निर्गमन क्षेत्रात विमानतळावरील एका कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करणार होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करताना, डीआरआय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, एक प्रवासी प्रस्थान क्षेत्रातील स्वच्छतागृहाजवळ थांबलेल्या एका व्यक्तीकडे जात आहे आणि विमानतळावरील एका दुकानात काम करणाऱ्या केवटला एक पॅकेज देत आहे. डीआरआय पथकाने त्या दोघांना अडवले. चौकशीदरम्यान, केवटने सांगितले की त्याला होसेनकडून मेणाच्या स्वरूपातील सोन्याची एक कॅप्सूल असलेला एक मोजा मिळाला होता. केवटच्या केलेल्या तपासणीमध्ये, सोन्याच्या चार कॅप्सूल असलेला एक लगडी सापडली.
Acting on specific intelligence developed by the Directorate of Revenue Intelligence (DRI), Mumbai Zonal Unit (MZU), officers busted a well-organised gold smuggling syndicate operating through Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA), Mumbai, involving five persons-two pax, one airport staff and two recipients.
During the operation conducted on 19–20 October 2026, DRI officers seized 2.317 kg of 24-carat foreign-origin gold bars, valued at approximately Rs 3.47 crore, and apprehended the five persons involved in the smuggling network.
Preliminary investigations have revealed the involvement of the accused in the clandestine movement and handling of the smuggled gold. The gold was seized under the provisions of the Customs Act, 1962, and all five accused were arrested.
Further investigation is underway to trace the wider network and identify other individuals involved in the smuggling syndicate.
— ANI (@ANI) October 21, 2026
पुढील चौकशीदरम्यान, केवटने अधिकाऱ्यांना माहिती दिली की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी काही प्रवासी येणार होते. ते त्यांना भेटून सिंडिकेट सदस्यांच्या माहितीप्रमाणे तशाच प्रकारच्या कॅप्सूल देणार होते. त्यानंतर DRI अधिकाऱ्यांनी केवट आणि त्याच्याजवळ येणाऱ्यांवर पाळत ठेवली. तेव्हा डोंगरे आणि मखिजा नावाचे आणखी दोन संशयित प्रवासी केवटजवळ आले आणि त्यांनी मोजे असलेले एक पॅकेज दिले, ज्यामधून सोन्याच्या दोन कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. “त्यांच्यापैकी कोणीही जप्त केलेल्या सोन्याच्या कायदेशीर खरेदीची कागदपत्रे किंवा इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज सादर करू शकले नाही,” अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे. DRI अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोन्याच्या सर्व कॅप्सूल बाबतीत अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. शिवाय तपासही सुरू आहे.
Mumbai News: मुंबईतील माहिम परिसरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) कारवाई करत 33 वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक केल्याचे वृत्त समोर आले आहे. जैश-ए-मोहम्मद ...
DRI अधिकाऱ्यांना सर्व अधिकृत पुरावे मिळाले नाही तर, सिंडिकेटच्या इतर प्रमुख सदस्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. सोन्याचे स्रोत, तस्करी केलेल्या सोन्याचे वितरण आणि अवैध मार्गांनी येणाऱ्या पैशांच्या हस्तांतरणाचाही तपास केली जाणार आहे.न्यायालयात डोंगरे आणि मखिजा यांच्या वतीने हजर असलेले वकील रवी हिरानी आणि स्वराली केळकर यांनी असा युक्तिवाद केला की, “आरोपींपैकी कोणीही एकमेकांना ओळखत नव्हते. प्रकरणाला अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यासाठी, DRI अधिकाऱ्यांनी वेगवेगळी प्रकरणे एकत्र केली आहेत. अटक केलेल्या व्यक्तींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे,” असे वकील हिरानी म्हणाले.