Kalyan News: कल्याण-डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई; नागरिकांवर पाणीकपातीचं संकट, तारीख अन् वेळ वाचा

KDMC Water Cut News: केडीएमसी क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रात काही देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे शहरामध्ये पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

कल्याण: कल्याण- डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. केडीएमसी क्षेत्रामध्ये 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केडीएमसीच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे केडीएमसी क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा कपात केली जाणार आहे. त्यामुळे कल्याण- डोंबिवलीकरांना केडीएमसीकडून पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्तीचे करण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरिता मंगळवार दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अशा एकूण तब्बल 18 तासांसाठी महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण (पूर्व- पश्चिम), कल्याण ग्रामीण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) आणि डोंबिवली (पूर्व- पश्चिम) परिसरामध्ये होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरीही ह्या पाणी पुरवठा बंदच्या काळामध्ये केडीएमसी क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून पाण्याचा पुरेसा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.



पाणी पुरवठा सुरळित झाल्यानंतर बुधवारी संपूर्ण दिवस केडीएमसी क्षेत्रात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. दरम्यान, पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. यावर्षी अपुरा परतीचा पाऊस, अलनिनोचा प्रभाव आणि ऑक्टोबर 2026 पासून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पाट बंधारे विभागाने संपूर्ण राज्यामध्ये असलेला पाण्याचा साठा पाहून पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अनेक महानगर पालिका क्षेत्रामध्ये पाणी कपात करण्यासोबतच आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा सुद्धा बंद करण्याचा घेतला आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरिकांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Uran Water Shortage: उरणकरांनो पाणी जपून वापरा! ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांवर पाणी कपातीचे संकट

उरण: उरण शहरामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे उरण शहरातील

Maharashtra Weather Update: पाऊस की उकाडा? महाराष्ट्रातील हवामानाचा ताजा अंदाज

मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या

BRICS 2026: संसद भवनात 12 वा BRICS संसदीय मंच; भारत-रशिया सहकार्यावर महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली: भारतीय संसदेच्या यजमानपदाखाली 26 ऑक्टोबर 2026 रोजी 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचाची सुरुवात होत आहे. या 2

ST Bus Fare Hike: सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा! परिवहन मंत्र्यांचा भाडेवाढीला नकार...

मुंबई: एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी आणि परिवहन मंत्र्यांनी सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा दिला आहे. सध्या

गोविंदाने सुनीतासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘मी हिंदू, आमच्याकडे 'घटस्फोट' शब्द…’

मुंबई: बॉलिवूडमधील हिरो नंबर 1 म्हणून फेमस असलेला अभिनेता गोविंदा अहुजा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक

Elon Musk Ukraine News: इलॉन मस्क यांचा युक्रेनवर गंभीर आरोप; म्हणाले, स्टारलिंकचा वापर लोकांना मारण्यासाठी...

वॉशिंग्टन: अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी युक्रेनवर त्यांच्या स्टारलिंक सेवेच्या अटींचे उल्लंघन केल्याचा