मुंबईत शिल्पा रावचा शो अचानक बंद; गायिकेची सोशल मीडियावर नाराजी

२४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कलाकारांनी आपली कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मात्र शिल्पा रावचा शो सर्वाधिक चर्चेत राहिला. याचे कारण म्हणजे तिचा शो मध्येच थांबवण्यात आला आणि १५ मिनिटे तसाच बंद राहिला. गायिकेचा माईक बंद करण्यात आला आणि लाईट्ससुद्धा बंद करण्यात आले. यादरम्यान, शिल्पा राव केवळ नाराजच नव्हती तर प्रेक्षकही चकित झाले होते. शिल्पाने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शोमध्ये घडलेल्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. तिने चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याचे स्वागतही केले आणि त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली.


मिळालेल्या वृत्तानुसार कार्यक्रमाच्या वेळापत्रकात झालेल्या विलंबामुळे शिल्पा रावचा कार्यक्रम अर्धवट थांबवण्यात आला. यावेळी स्टेजवरील दिवे बंद करण्यात आले आणि गायिकेचा माईकही बंद करण्यात आला. चाहते तिला ऐकण्यासाठी उत्सुक होते आणि तिचे नाव घेऊन तिला प्रोत्साहन देत होते. परंतु आयोजकांनी माईक पुन्हा सुरु केला नाही किंवा शिल्पाला तिच्या चाहत्यांचा निरोप घेण्याची संधीही दिली नाही. आता तिने सोशल मीडियावर या कार्यक्रमाबद्दल एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने नाराजी व्यक्त केली आहे आणि तिच्या चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.





इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत शिल्पा रावने लिहिले: "आज मुंबईत माझ्या मनाला वेदना झाल्या. जेव्हा एखादे इतके सुंदर व्यासपीठ अशा प्रकारे हिरावून घेतले जाते, तेव्हा खूप वेदना होतात. तरीही, संगीत थांबले असतानाही तुम्ही थांबला नाहीत. तुम्ही माझे नाव पुकारत राहिलात आणि तुमच्या आवाजातील प्रेम मी स्पष्टपणे अनुभवू शकले. आज रात्री आपली गोष्ट पूर्ण होऊ शकली नाही, पण मी तुम्हाला वचन देते, मी नक्की परत येईन. माझे मुंबईवर खूप प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील. शिल्पा."

Comments
Add Comment

Chandivali Accident : चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; 4 जण जखमी, महिला चालक पोलिसांच्या ताब्यात

Mumbai News: मुंबईतील चांदिवली परिसरातील नहार शक्ती विभागात कारने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! धारावीकरांना दिलासा; सायन उड्डाणपुलावरून 28 महिन्यांनंतर BEST बस धावणार

मुंबई: सायन आणि धारावीकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बस पुन्हा 28

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील सुरत कनेक्शन समोर; मुंबई क्राइम ब्रँचने 2 बंदुका, 10 काडतुसे जप्त

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.

DRI ची मुंबई विमानतळावर मोठी कारवाई! 2.29 किलो सोने जप्त, चौघांना ठोकल्या बेड्या

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीला महसूल

Mumbai Bomb Threat : महापौर रितू तावडे यांचे कार्यालय आणि अमेरिकन स्कूलला बॉम्बची धमकी; अमिताभ बच्चन अन् दिलजीत दोसांझ यांच्या नावाचाही उल्लेख

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत खळबजनक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे

Mumbai ATS : मुंबईत ATS ची मोठी कारवाई; जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून माहिममधून तरुणाला अटक

Mumbai News: मुंबईतील माहिम परिसरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) कारवाई करत 33 वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक