Monday, October 26, 2026

मुंबईतील अंधेंरीत संतापजनक प्रकार : १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चालवला पाण्याचा टँकर; कार आणि इमारतीच्या भिंतीला दिली धडक!

अंधेंरीच्या एमआयडीसी (MIDC) परिसरातील महाकाली रोडवर रविवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. हा मुलगा टँकरवर ताबा ठेवू शकला नाही आणि त्यामुळे झालेल्या अपघातात टँकर आधी एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर आदळला आणि नंतर थेट एका इमारतीच्या भिंतीवर जाऊन धडकला.

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. येथे एका अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पाण्याचा टँकर चालवल्याची घटना घडली आहे. अंधेंरीच्या एमआयडीसी (MIDC) परिसरातील महाकाली रोडवर रविवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. हा मुलगा टँकरवर ताबा ठेवू शकला नाही आणि त्यामुळे झालेल्या अपघातात टँकर आधी एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर आदळला आणि नंतर थेट एका इमारतीच्या भिंतीवर जाऊन धडकला. या संपूर्ण अपघाताची थरारक दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. समोर आलेल्या फुटेजमध्ये हा टँकर अतिशय वेगात येताना आणि काही क्षणातच कार व भिंतीला धडकताना स्पष्टपणे दिसत आहे. अपघात झाल्यानंतर लगेचच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याचेही यात पाहायला मिळते.

https://www.instagram.com/reel/De8vQ5zDVdL/?utm_source=ig_web_copy_link&srtk=MzRlODBiNWFlZA==

या भीषण अपघातात टँकर चालवणारा अल्पवयीन मुलगा किरकोळ जखमी झाला आहे, मात्र उभ्या असलेल्या कारचे आणि पाण्याच्या टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या संपूर्ण घटनेचा कसून शोध घेत आहेत. एवढ्या मोठ्या वजनाचा आणि अवजड वाहन या लहान मुलाच्या हातात कसे आले? त्याला हे वाहन चालवण्याची परवानगी कोणी दिली? या सर्व गोष्टींचा पोलीस सखोल तपास करत असून दोषींवर कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >