न्यूझीलंडसाठी करो या मरोची स्थिती! तर भारताला मालिका विजयाची संधी, तिसरा टी20 सामना कुठे पाहणार? जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात भारताने सरशी घेतली. आता तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यावर भारताने पकड मिळवली. भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर आहे. आता उर्वरित तीन पैकी एक सामना जिंकला तर भारत मालिका खिशात घालेल. तिसरा टी20 सामना वेलिंग्टनच्या हेनरी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडसाठी करो या मरोची स्थिती आहे. कारण यापुढे न्यूझीलंडने एकही सामना गमावला तर मालिका हातची जाईल. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 200हून अधिक धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य भारताने सहज गाठलं. त्यानंतर दुसऱ्या टी20 सामन्यात भारताची स्थिती नाजूक होती. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर तिलक वर्मा, नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी हा सामना काढला.

भारत न्यूझीलंड टी20 मालिका हेड टू हेड


आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारत आणि न्यूझीलंड 33 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 21, तर न्यूझीलंडने 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

भारत न्यूझीलंड तिसरा टी20 सामना कधी?


भारत न्यूझीलंड तिसरा टी20 सामना 24 ऑक्टोबर 2026 रोजी, शनिवार होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सामना सुरू होईल. नाणेफेकीचा कौल 12 वाजता होणार आहे.


भारतात न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसऱ्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहावे?


न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसऱ्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल.

भारतात न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसऱ्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहावे?


सोनीलिव्ह आपल्या ॲप आणि वेबसाइटद्वारे न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण करेल.

न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसरा टी20 सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11


न्यूझीलंडचे संभाव्य 11 खेळाडू:फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, ब्लेअर टिकनर

भारताचा संभाव्य प्लेइंग 11 :अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव
Comments
Add Comment

India A vs NZ A Test: देवदत्त पडिक्कलचं द्विशतक एका धावेने हुकलं! अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; 199 धावांवर बाद

लिंकन, न्यूझीलंड : भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज

एल क्लासिकोमध्ये एमबाप्पेचा डबल धमाका! रिअल माद्रिदचा बार्सिलोनावर 2-1 ने विजय; 100 गोलांचा ऐतिहासिक टप्पा गाठला

बार्सिलोना : फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठेच्या एल क्लासिको सामन्यात रिअल माद्रिदने बार्सिलोनाचा 2-1 असा पराभव केला.

PAK vs ENG : शादाब खान LBW OUT, इंग्लंडने विजय साजरा केला; DRS ने फिरवला सामना! पाकिस्तानचा 1 विकेटने थरारक विजय

लाहोर : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील वनडे तिरंगी मालिकेतील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

INDW vs ZIMW: मंधाना ब्रिगेडचा झिम्बाब्वेला दणका; टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही नावावर, दुसऱ्या सामन्यात असं घडलं..

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल

IND-W vs ZIM-W: दीप्ती शर्माची झिम्बाब्वेविरुद्ध वादळी शतकी खेळी! 86 चेंडूंत 106 धावा; भारताची 328 धावांची मजल

वडोदरा : भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार फलंदाजी करत 50

IND-W vs ZIM-W: हरमनप्रीत कौरचं झिम्बाब्वेविरुद्ध धडाकेबाज शतक! 104 चेंडूंत गाठला 100 धावांचा टप्पा

वडोदरा : भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौरने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय