Sinhastha Kumbhmela: जिवंतपणी स्वतःचे पिंडदान! जाणून घ्या नागा साधू बनण्यामागची कठोर तपश्चर्या आणि नियम

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याचं पर्व सुरू आहे. अमृतस्नान जुलै महिन्यात आहे. पण देशभरातील साधू संत आपल्या आखाड्यात येण्यास सुरूवात होईल. असं असताना यात नागा साधू हे प्रमुख आकर्षण असतं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या ध्वजारोहणानंतर सुरूवात होणार आहे. जवळपास दोन वर्षे हा कुंभमेळा असणार आहे. नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त येथे कुंभमेळा भरणार आहे. शैव आणि वैष्णव आखाड्यांचा मेळा या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. कुंभमेळ्यात नागा साधुंना मानाचं स्थान आहे. तसेच जगभरातील लोकांना या नागा साधुंचं आश्चर्य वाटतं. कारण त्यांचं राहणीमान आणि खानपान कायम चर्चेचा विषय ठरला आहे. असं असताना नाशिकच्या कुंभमेळ्यातही नागा साधुंचं खास आकर्षण असेल. चला जाणून घेऊयात नागा साधु आहेत तरी कोण? नागा साधु होतात तरी कसे? याबाबतची नियमावली काय? सर्वकाही जाणून घेऊयात..



असे होतात नागा साधु!


एखादी व्यक्ती नागा साधु होण्यासाठी आखाड्याकडे आपली इच्छा व्यक्त करते. त्यानंतर आखाडा समिती त्या व्यक्तीबाबत माहिती गोळा करते. सदर व्यक्ती नागा साधु होण्याच्या लायक आहे की नाही? याची शहनिशा केली जाते. सदर व्यक्तीच्या जीवनाबाबत सर्व माहिती गोळा केल्यानंतर आखाडा समिती त्याला सहभागी करून घेते. पण नुसतं सहभागी केलं की नागा साधु होतो, असं नाही. त्यासाठी कठीण परीक्षेतून जावं लागतं. 12 वर्षे कठीण तपस्या करावी लागते. त्या व्यक्तीला सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो. या दरम्यान ब्रह्मचर्येचं पालन करावं लागतं. या परीक्षेनंतर पंच देवांकडून दीक्षा प्राप्त करावी लागते. पंच देव म्हणजेच शिव, विष्णु, शक्ती, सूर्य आणि गणेश..इतकंच काय तर स्वत:चं पिंडदान करावं लागत. म्हणजे जिवंतपणी मृत झालो म्हणून पिंडदान केलं जातं. भिक्षा मागून मिळालेलं अन्नच ग्रहण करावं लागतं.त्यातही जर भिक्षा मिळाली नाही तर उपाशी राहावं लागतं. कारण त्याला दिवसाला फक्त सात घरातून भिक्षा मागण्याची परवानगी आहे. त्यात दिवसातून फक्त एकदाच अन्नग्रहण करू शकतात.



नागा साधु होण्याची पहिली सहा वर्षे महत्त्वाची असतात. या काळात नागा साधु फक्त लंगोट परिधान करतात. कुंभ मेळ्यात दीक्षा घेतल्यानंतर लंगोटचाही त्याग करतात. नागा साधु झाल्यानंतर आयुष्यभर निवस्त्र राहावं लागतं. कारण वस्त्र हे सांसारिक जीवनाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नागा साधु त्यानंतर वस्त्र वापरत नाही. तसेच शरीर झाकण्यासाठी भस्माचा वापर करतात. इतकंच काय तर नागा साधु त्यांच्या उर्वरित आयुष्यात कोणासमोरही वाकत नाहीत आणि निंदाही करत नाहीत. नागा साधु फक्त मोठ्या संन्याशी साधुंपुढेच नतमस्तक होतात. या सर्व नियमांचं पालन करणाऱ्या साधुला नागा साधु संबोधलं जातं. नागा साधु कधीच बेडवर झोपत नाही. नागा साधुंना सनातन धर्माचे रक्षक मानलं जातं. नागा साधु युद्धकलेत पारंगत असतात.



कुंभमेळ्यानंतर नागा साधु जातात कुठे?


कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधु जातात तरी कुठे? हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण हजारोंच्या संख्येने आलेले नागा साधु अचानक गायब होतात. तसेच क्वचितच दिसतात. कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधू आपल्या आखांड्यामध्ये परत जातात. तिथे ध्यानसाधना करतात आणि तपस्वी जीवन जगतात. काही नागा साधू हिमालयात किंवा जंगलात स्थलांतर कतारत. तेथील फळं आणि फुलांवर जगतात. काही नागा साधू हे प्रयागराज, नाशिक, हरिद्वाग आणि उज्जैनसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांवर राहतात.

Comments
Add Comment

अर्णब चक्रीवादळाचा धोका वाढला! आंध्र प्रदेशसह 5 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्णब चक्रीवादळ वेगाने तीव्र होत आहे. हे वादळ आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकत असून

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : २२ वर्षांच्या इंजिनिअरला मध्य प्रदेशातून अटक; जामिनावर सुटताच रचला होता नवा कट!

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासात मुंबई

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणाच्या चौकशीसाठी 'एसआयटी' - मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

मुंबई : मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपमध्ये ५०० कोटी रुपयांचा उल्लेख असल्याने या प्रकरणाच्या

Mumbai Crime: पत्नीशी वाद अन् बाळाला स्कायवॉकवरून फेकल्याचा आरोप; पिता अटकेत

मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या

Hyundai Bayon भारतात लाँच : क्रेटापेक्षा स्वस्त आणि दमदार SUV ची बाजारात एन्ट्री, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या!

ह्युंदाई मोटर इंडियाने (Hyundai) भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपली नवीन SUV 'Bayon' अधिकृतपणे लाँच केली आहे. कंपनीने या गाडीची

IND vs NZ 3rd T20I : ईशान किशन OUT! वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी; फलंदाजी क्रमात बदल होणार?

वेलिंग्टन (न्यूझीलंड): भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्याने