Monday, October 26, 2026

Menstrual Pain Relief: कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचा ट्रेंड; मासिक पाळीत खरंच होतो का फायदा?

मासिक पाळी दरम्यान कॉफी मध्ये तूप घालून पित आहात? तर जाणून घ्या फायदे

1/6 मासिक पाळीदरम्यान ब्लॅक कॉफीमध्ये तूप घालून पिणे, ज्याला अनेकदा 'घी-कॉफी' किंवा बुलेटप्रूफ कॉफी म्हटले जाते, हा एक घरगुती उपाय म्हणून सध्या खूप चर्चेत आहे. मासिक पाळीदरम्यान थकवा, पोट फुगणे आणि वेदना यांचा त्रास अनेक महिलांना होतो. अशा वेळी ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. पण या मिश्रणाचे खरंच फायदे होतात का? जाणून घ्या...   2/6 ऊर्जा वाढण्यास मदत (Energy Boost):
पाळीदरम्यान संप्रेरकांमधील (Hormones) बदलांमुळे महिलांना प्रचंड थकवा जाणवतो. कॉफीमधील कॅफिन झटपट ऊर्जा देते. त्यात तूप मिसळलयाने तुपातील 'हेल्दी फॅट्स' कॅफिन शोषून घेण्याचा वेग मंद करतात. परिणामी, शरीराला अचानक झटका न बसता दिवसभर संतत आणि टिकून राहणारी ऊर्जा मिळते.   3/6 पोटदुखी आणि पेटके कमी करणे (Cramps Relief):
कॉफीमधील कॅफिनमुळे काही प्रमाणात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे सुरुवातीला किरकोळ वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच, शुद्ध साजूक तुपामध्ये दाहकशामक (Anti-inflammatory) गुणधर्म असतात, जे शरीरातील अंतर्गत सूज आणि पाळीचे पेटके (Cramps) सुसह्य करण्यास मदत करतात.   4/6 ॲसिडिटीपासून संरक्षण (Digestive Support):
रिकाम्या पोटी किंवा पाळीच्या दिवसांत फक्त ब्लॅक कॉफी पियाल्याने पोटात ॲसिडिटी किंवा जळजळ होऊ शकते. तुपामुळे कॉफीची ही आम्लता (Acidity) कमी होते आणि पोटाच्या अंतर्गत अस्तराचे रक्षण होते.   5/6 पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता कमी करणे:
पाळीदरम्यान अनेक महिलांना गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तुपामध्ये 'ब्युटीरिक ॲसिड' (Butyric acid) असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पाळीत होणारा पोटाचा फुगवटा (Bloating) कमी करते.   6/6 मूड सुधारण्यास मदत (Mood Enhancement):
कॅफिन शरीरातील सेरोटोनिनसारखे फिल-गुड हार्मोन्स उत्तेजित करते. तुपातील फॅटी ॲसिडस् या परिणामाची पातळी टिकवून ठेवतात, ज्यामुळे पाळीदरम्यान होणारी चिडचिड आणि मूड स्विंग्स (Mood swings) नियंत्रित राहतात.    
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा