Pune Hinjewadi to Shivajinagar Metro : पुणेकरांनो अखेर मुहूर्त ठरलाचं! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे 'या' दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

पुणे : पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो मार्गिका ३) या २३.३ किलोमीटरच्या मेट्रो लाईनच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. आगामी ३ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मेट्रो मार्गिकेचे दिमाखदार उद्घाटन होणार आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.



आयटी पार्क क्षेत्रातील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Cyclone Arnab News : बंगालच्या उपसागरात ''अर्णब'' चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागासाठी प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अर्णब' (Cyclone Arnab) नावाचे चक्रीवादळ आता अधिकच भयानक रूप धारण करत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे वादळ वेगाने ...


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) माध्यमातून 'सार्वजनिक-खासगी भागीदारी' (PPP) तत्त्वावर उभारण्यात आलेली ही मार्गिका पुण्याची ओळख असलेल्या हिंजवडी आयटी पार्कला थेट शहराच्या मध्यवर्ती भागाशी (शिवाजीनगर) जोडणार आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी, बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर या भागांतील लाखो नोकरदार आणि प्रवाशांचा रोजचा वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.



स्थानकांची सद्यस्थिती आणि नवीन प्रकल्पांचे भूमिपूजन


स्थानकांची स्थिती : २३.३ किलोमीटरच्या या संपूर्ण मार्गावर एकूण २३ स्थानके (स्टेशन्स) असून, त्यापैकी १७ स्थानके उद्घाटनासाठी पूर्णपणे तयार आहेत. उर्वरित ६ स्थानकांचे काम सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे.


नवीन प्रकल्पांची भेट : ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या याच सोहळ्यात पुण्यातील मेट्रोच्या पुढील आणखी दोन टप्प्यांचे भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाणार आहे.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Cyclone Arnab News : बंगालच्या उपसागरात ''अर्णब'' चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागासाठी प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अर्णब' (Cyclone Arnab) नावाचे चक्रीवादळ आता अधिकच भयानक रूप धारण करत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे वादळ वेगाने ...


आचारसंहितेनंतर अधिकृत घोषणा


यापूर्वी विविध कारणांमुळे आणि विधान परिषद (पदवीधर व शिक्षक मतदारसंघ) निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. तसेच पंतप्रधान मोदींचा थेट पुणे दौरा पुढे ढकलला गेला असला, तरी प्रवाशांची सोय लक्षात घेता व्हर्च्युअल पद्धतीने ३ नोव्हेंबरलाच उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपताच याबाबतची अधिकृत प्रशासकीय घोषणा केली जाईल. वारंवार पुढे ढकलल्या गेलेल्या या मेट्रो प्रकल्पाचे अखेर उद्घाटन होत असल्याने हिंजवडीत रोज प्रवास करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Tags
Pune breaking NewsPune Local Newspune metro updatepmrda metro projectPune metro inauguration datePune transport newsHinjewadi to Shivajinagar metroPM Modi Pune visitHinjewadi metro route MarathiIT engineers Pune metroLatest news Pune MarathiMetro line 3 Pune

Comments
Add Comment

"कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडली?" नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंना भर पत्रकार परिदेत सवाल

मुंबई: भीमाशंकरच्या जंगलामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. या जंगलतोडीच्या व्हिडिओ आणि फोटो

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लावणी कलाकारांकडून एक लाख रुपयांचा निधी सुपूर्द

राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने

ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीपूर्व वेतनासाठी शासनाकडून 391 कोटींचा निधी मंजूर

ST Employees: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

CET परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांना मिळणार दोन संधी

तांत्रिक, व्यावसायिक, वैद्यकीय आणि इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सामायिक प्रवेश

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा चटका कायम; 28 ऑक्टोबरपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता

Weather News: महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा चटका कायम असून, अनेक भागांत दिवसा तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअस किंवा त्यापुढे

मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई: मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे