NCP : राष्ट्रवादीची मोठी घोषणा! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी, 28 ऑक्टोबर रोजी या नियुक्त्यांची घोषणा केली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी, 28 ऑक्टोबर रोजी या नियुक्त्यांची घोषणा केली. ( Maharashtra Politics)



देवगिरी निवासस्थानी नियुक्तीपत्र प्रदान


मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ अजित पवार उपस्थित होते. तसेच पक्षाचे अन्य नेते आणि पदाधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.



पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी


या नियुक्त्यांमुळे उमेश पाटील यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची, तर झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबईतील पक्ष संघटनेची जबाबदारी असेल.


लोकनेते अजित पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने काम करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.


Comments
Add Comment

Jio Platforms IPO Listing : जिओच्या शेअरची दमदार एंट्री ! लिस्टिंग होताच गुंतवणूकदारांना एका लॉटवर 'इतका' नफा

मुंबई : शेअर बाजारात बुधवारी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओच्या लिस्टिंगकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. अखेर

Captain Smit Machhar : विमानातील दहशतवादी हल्ल्याचा सामना करणाऱ्या स्मित मच्छार यांचा UAE कडून सन्मान; ‘फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II’ पुरस्कार जाहीर

Captain Smit Machhar : विमानातील गंभीर हल्ल्याच्या प्रसंगी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्य दाखवणारे फ्लायदुबईच्या

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा! अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांची शक्यता

Maharashtra Weather News: राज्यात एकीकडे ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत असताना दुसरीकडे पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची

Diwali Pollution : प्रदूषण पसरवणारे नको तर हरित फटाके फोडा! ; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण नियंत्रण तसेच आरोग्यविषयक दुष्परिणामाबाबत

Tribal Community : आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सरकारचा मोठा निर्णय; वनहक्क दाव्यांसाठी 15 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम

Maharashtra News: आदिवासी समाजाच्या शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन, पाणीपुरवठा, आधार कार्ड आणि कामगार कल्याणाशी संबंधित प्रश्न

Maharashtra Farmers : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रिम मदत; पीक कर्जाबाबतही मोठा निर्णय घेण्याचे संकेत

Maharashtra News: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही